पोस्ट्स

ऑगस्ट, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वैचारिक हालचाल

इमेज
आपण अतिशय मूलभूत गोष्टींचा विचार आज करणार आहोत. जर आपणास या विषयाचे आकलन झाले तर मला याचे खरेच आश्चर्य वाटेल. कारण हे खरोखर अतिशय गंभीर आणि तितकेच आवश्यक असे आहे. आपल्या आशा आकांक्षा हेच आपल्या दुःखाचे कारण आहेत. आशा आकांक्षा निर्माण होण्यासाठी आणि त्याची पूर्तता करण्यासाठी आपणास विचार करावा लागतो. म्हणजे आपले विचार हे मूलभूत कारण असते आपल्या दुरवस्थेला. विचार करणारे आपले मन हे आपले वैयक्तिक मन नसते कारण समाजातील हजारो वर्षापासून प्रचलित असणाऱ्या श्रद्धा आणि परंपरा यांच्या माहिती पासून आपले मन तयार झालेले असते. याची निर्मिती पुरोहितांनी, तत्वज्ञान्यानी, सुशिक्षितानी ज्ञानाचा अधिकाधिक प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सतत वाढविला आहे. हे समजल्यानंतर आपण आपल्या विचारांना थांबविले पाहिजे असे वाटणे साहजिक आहे. परंतु महत्वाचा प्रश्न असा आहे की, आपण आपल्या विचारांना थांबवू शकतो का? आपणास कोणी तरी ती कला आत्मसात करण्यास प्रोत्साहित करते. मग आपण त्या प्रमाणे काहीतरी बनण्याचा किंवा काहीच न बनण्याचा निर्णय करतो. निर्णय घेणारे कोण असते? निर्णय आणि निर्णय घेणारा हे दोन्ही विचार आहेत, त्या अर्थाने ते सम...