मानसिक मृत्यू हाच सत्य साक्षात्कार करण्याचा एकमेव मार्ग आहे
मृत्यूविरुद्ध प्रखर प्रतिकार करून, अनेक मार्गाने झगडून अखेर आपणास हे जग सोडून जावे लागते पण कसलाही प्रतिकार न करता, दुःखी जीवन न जगता, आत्महत्येचा विचार सुद्धा न करता, चांगले आरोग्य असताना आणि जिवंत असताना आपणास मृत्यूच्या घरात प्रवेश करणे शक्य होईल का? होय, हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा मन त्याच्या मी पणाला म्हणजे स्वतःला मारते. आपली समस्या हि शारीरिक मृत्यूची नाही, तर मनाने शतकानुशतके जमवलेल्या त्याच्या पारंपरिक माहिती संग्रहातून, सतत वाढत जाणाऱ्या स्मृतीतून, त्याने स्वत:ला अधिक बळकट करणे ही आहे. मन स्वतःला स्वतःच्या बंधनातून मुक्त कसं करू शकतं? एकतर बाहेरील शक्ती आवश्यक आहे, नाहीतर भूतकाळाने कलुषित झालेल्या मनाच्या अशुद्ध भागाला मनाच्या काळ विरहित शुद्ध आणि पवित्र भागाने हस्तक्षेप केला पाहिजे. बाहेरील शक्तीचा जो काल्पनिक प्रभाव ग्रहीत धरला जातो त्यानेच त्याच्या परंपरा, श्रद्धा आणि संस्कृतींनी मनाला कलुशित केले आहे. जर बाहेरची शक्ती गृहीत धरली तर ती मनाच्या पलीकडची गोष्ट असेल म्हणजे मन कोणत्याही स्वरूपात त्याला स्पर्श करू शकणार नाही. विचार हा मानसिक काळाचा परिणाम ...