पोस्ट्स

मार्च, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

संमोहन ते सत्य

इमेज
DAVID BOHM: आपले जीवन जे विचारांवर आधारित असते त्याला आपण वास्तव जीवन समजतो. वास्तव जीवनामध्ये संमोहनाच्या मुळे अज्ञान असते, विकृती आलेली असते. एखाद्याच्या हे अज्ञान लक्षात येऊ शकते आणि तो त्यापासून वेगळा होण्याचा प्रयत्न करू शकतो.  कृष्णमूर्ती: आपले संमोहन लक्षात येणे हाच खरा चमत्कार आहे आणि त्याची ऊर्जा बनते जी आपले जीवन बदलू शकते.  DAVID BOHM: होय, वास्तव क्षेत्रात विकृती टाळता येऊ शकत नाही. वास्तवाच्या क्षेत्रात विकृती पासून वेगळा कोणताही मार्ग असू शकत नाही. कृष्णमूर्ती: आपण असे म्हणत आहात की वास्तविकतेच्या क्षेत्रात विकृती अपरिहार्य आहे? डेव्हिड बोहम: होय, जोपर्यंत आम्ही त्या क्षेत्रात राहतो. कृष्णमूर्ती: नक्कीच, वास्तविक जीवन हे विकृत असते. डेव्हिड बोहम: मला वाटते की बरेच लोक सहमत असतात की आपण संमोहित झालो आहोत याबद्दल, परंतु ते आशावादी आहेत की याबद्दल ते काहीतरी करू शकतील.  कृष्णामूर्ती: बरोबर आणि ते थांबवण्याची इच्छा हा संमोहनचाच आणखी एक प्रकार आहे. डेव्हिड बोहम: म्हणून मला हे म्हणायचे आहे की त्या संमोहनाच्या क्षेत्रातून बाहेर येण्याचा कोणताही मार्ग नाही काय? कृष्...

राष्ट्रीयता आणि संघटित धर्म हे सत्य शोधातील अडथळे होत

इमेज
सत्य समजण्यासाठी तुम्ही तुमच्या नेत्यांवर शंका घ्याल? सत्य शोधून काढण्यासाठी गोष्टीचा केवळ स्वीकार करण्याऐवजी तुम्ही त्यावर टीका करायला नको का, त्यासंबंधी प्रश्न, विचारणा करावयास नको का? टीका करण्याची तुमची हिंमत होईल?  या प्रश्नात अधिकाराचा स्वीकार अंतर्भूत आहे; कोणीतरी तुम्हाला काहीतरी सांगते आणि तुम्ही ते लगेच मान्य करता. स्वीकारण्यामध्ये आंधळेपणा व बुद्धिमत्तेचा पूर्ण अभाव असतो, मग ते कोणीही का सांगितलेले असेना. विचारणा करण्याची, छडा लावण्याची टीकात्मक क्षमता जर तुम्ही गमावलेली असेल तर सत्य काय आहे हे तुम्हांला कधीही सापडणार नाही.  हा एक महत्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवला पाहिजे की, गोष्टी मान्य न करता आपण त्यासंबंधी विचारणा केली पाहिजे, त्यासंबंधीचे सत्य काय आहे ते शोधून काढले पाहिजे आणि सत्य काय आहे ते शोधण्यासाठी तुमच्याजवळ कोणत्याही गुरूचे अथवा राजकारणी व्यक्तीचे मार्गदर्शन नव्हे, तर एक खुले हृदय व मोकळे मन असले पाहिजे.  संघटित धर्म म्हणजे सत्य शोधातील अडथळाच होय; कारण असे धर्म त्यांचे अंधविश्वास, हाताने किंवा मानसिक स्तरावर बनविलेल्या त्यांच्या प्रतिमा, त्यांच...