पोस्ट्स

सप्टेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

चैतन्य हे विचारांचे बनलेले आहे

इमेज
  चैतन्य हे फक्त विचार आहेत - कृष्णमूर्ति पारंपरिक तत्वज्ञान हे चैतन्य आणि त्याच्या चार अवस्था यांना अतिशय महत्त्व देते. जागृती, स्वप्न, सुशुप्ती, तुरिया अशा चैतन्याच्या त्यांनी वेगवेगळ्या अवस्था सांगितल्या आहेत. जागृती मधील जाणीव आणि इतर अवस्थेतील जाणीव या वेगवेगळ्या आहेत आणि जी व्यक्ती या सर्व अवस्था आणि सर्व जाणिवांच्या अतीत जाईल त्याला सर्वज्ञ समजण्याचा पारंपरिक गैरसमज आहे. मुळात मी म्हणजे काय याची समज नसल्याने परंपरांनी त्याला आत्मा असे संबोधले होते. प्रत्येक जीवाचा जसा आत्मा तसा त्यांनी विश्वाचा विश्वात्मा, परमात्मा आणि त्यांच्या ब्रम्ह अवस्था अशा अनेक संकल्पना तयार केल्या. या काल्पनिक संकल्पनांचा कोणालाच अनुभव येत नसतो. म्हणून मग चार अवस्थांचा निरास झाल्या नंतर त्याची अनुभूती होईल असे त्यांनी खोटे सांगितले. त्यांनी त्यांचे अज्ञान अशा प्रकारे झाकून ठेवून त्या अज्ञानाला श्रद्धा च्या आवरणामध्ये अधिक मजबूत केले. कोणत्याही साधकाने कितीही मोठी साधना केली तरी तो चार अवस्थांचा निरास करू शकणार नाही आणि त्यांचे बिग फुटणार नाही याची तजवीज या चार अवस्था निराकरण लबाडी मध्ये आहे.  कृ...

कृतिशील समाज कार्य

इमेज
  आपण कृतिशील प्रयत्न करीत नाही म्हणून सामाजिक नैतिक मूल्यांचा र्हास होत आहे. समस्या अतिशय गंभीर होत चालली आहे म्हणून आपणास कृतिशील होणे आवश्यक आहे.  कोणत्याही समस्येवर उपाययोजना करण्यापूर्वी आपणास त्या समस्येची जाणीव असणे आवश्यक असते. समस्येवरील उपाय सुद्धा तेच ते जुन्याचे केवळ नूतनीकरण नसावे.  आपण एकमेकांचे अंधानुकरण करीत असतो, आणि ते आपल्या अंगवळणी पडले आहे. नवीन निर्माण करण्यासाठी वेळ आणि कल्पकता लागते ती आपण हरवून बसलो आहोत. कळपातील प्राण्यांप्रमाणे आपण एकमार्गी झालो आहोत. व्यक्ती ही व्यक्तिगत राहिली नसून ती समाजाचा भाग बनली आहे. समाजातील ठराविक धार्मिक किंवा सामाजिक नमुन्यांमध्ये आपण स्वतःला बसवीत असतो. अंधानुकरण मुळे व्यक्तिगत मत निर्माण होणे बंद झाले आहे. आपण प्रत्येकजण आपल्या धर्माचे, गुरूंचे, नेत्यांचे मानसिक गुलाम झालो आहोत. आपल्या प्रतिक्रिया त्यांच्या मताप्रमाणे असतात.  मानवी समाजाच्या अवनतीचे अंधानुकरण हे एक प्रमुख कारण आहे आणि त्यामधील भयानक प्रकार हा आहे की आपण ज्यांचे अनुकरण करीत असतो ते नेते सुद्धा अंधानुकरण करत असतात आणि तेच त्यांचे चातुर्य असते. ख...

सामाजिक क्रांती की वैयक्तिक मन परिवर्तन

इमेज
  समाज म्हणजे काय असतो? आपले एकमेकांशी असलेले नाते संबंध म्हणजे समाज असतो. आपले सर्वांचे जर आतून परिवर्तन झालेच नसेल तर समाजाचे सुद्धा परिवर्तन होणे शक्य नसते. आणि यामुळेच हजारो वर्षे त्याच त्या परंपरा फक्त नवीन प्रकारात समाजात येत राहतात. सामाजिक मूल्ये तीच राहतात, समाज जिथल्या तिथेच राहतो. नाविण्यास मज्जाव केल्याने समाजात जिवंतपणा रहात नाही. समाजातील या जुन्या परंपरा घालविणे अत्यावश्यक ठरते.  समाजातील गोंधळ, दुःख, नैराश्य, दारिद्र्य कोठून येते? ते कोणी व्यापारी, राजकारणी, पुजारी, नास्तिक लोक तयार करतात काय? आपणच ते तयार करीत असतो. ते आपल्या एकमेकांच्या नात्या मधून येत असते. आपल्या घरातील कलह, भाऊबंदकी बाहेरून येते की आपणच त्यास जबाबदार असतो. आणि आपले हे कलह घेवून आपण ते बाहेरच्या समाजात देत असतो. आणि आपल्या प्रत्येकाच्या नात्यांमधील कलह हाच समाजातील गोंधळाची परिस्थिती निर्माण करीत असतो. आपले एकमेकांचे जे संबंध असतात त्यातूनच तर समाज बनत असतो. आणि आपल्यामध्ये जर अहंकार, संकुचित वृत्ती, गोंधळ असेल तर तेच समाजात पसरते आणि त्यातूनच समाजात अराजक माजते.  आपण प्रत्येकजण या समा...

व्यक्ती आणि समाज

इमेज
व्यक्ती हि समाजाच्या हातचे बाहुले आहे की व्यक्तीच्या उन्नतीसाठी समाज आहे? हा एक नक्कीच खूप महत्वाचा विषय आहे.  आपण समाजाचे, सरकारी यंत्रणांचे, धार्मिक समूहाचे प्यादे असावे काय? त्यांनी त्यांचा हेतू साध्य करण्यासाठी आपला हवा तसा उपयोग करून घ्यावा काय? की प्रत्येक व्यक्तीचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्यांनी सहाय्यभूत असावे? जर व्यक्ती पेक्षा समाज महत्वाचा असेल तर प्रत्येक व्यक्तीने त्याचा स्वतःचा विचार करणे सोडून द्यावे लागेल आणि फक्त समाज, सरकार, धार्मिक संघटना यांच्यासाठी गुलामा सारखे सतत काम करीत राहावे लागेल. एखादी व्यक्ती त्या संस्थेच्या उपयोगाची असेल तर ठेवली जाईल आणि नसेल तर काढली जाईल किंवा व्यक्तीचा व्यापार केला जाईल. परंतु जर समाज हा व्यक्तीच्या भल्यासाठी असेल तर व्यक्तीला सामाजिक बंधनातून मुक्त ठेवावे लागेल, त्याला संपूर्ण स्वातंत्र्य द्यावे लागेल. या दोन व्यवस्थे मधील काय योग्य आहे किंवा काय अयोग्य आहे याचा आपण सखोल विचार करायला हवा. या विषयाच्या खोलात जाण्यासाठी आपण पूर्वीच्या मतांचा, ज्ञानाचा, ग्रंथांचा, गुरूंचा आधार घेणे योग्य होणार नाही. कारण त्यामुळे आपला शोध हा पू...

स्वतःची खरी ओळख

इमेज
But that is the last thing we want to know about ourselves. Surely that is the only foundation on which we can build. जी गोष्ट आपणास जीवनाच्या सुरुवातीस आकलन होणे आवश्यक असते तीच गोष्ट आपण जीवनाच्या अंतिम दिवसाकडे ढकलीत राहतो. जे ज्ञान आपल्या जीवनाचा पाया होणे गरजेचे होते ते न मिळाल्याने आपले बहुतेक जीवन अज्ञानात व्यतीत होते. परिणामी जीवन सुखद होण्या ऐवजी ते दुःख आणि नैराश्याच्या गर्तेत सापडले जाते. जोपर्यंत आपण स्वतःस योग्य रीतीने ओळखू शकणार नाही तो पर्यंत बाहेरील गुरु, संप्रदाय, त्यांचे ग्रंथ आपणास इतर कोणीही मदत करू शकणार नाहीत. ते मदत कोणास करणार? त्यासाठी स्वताची खरी ओळख असणे म्हणजेच स्वतःचा साक्षात्कार असणे, आत्मसाक्षात्कार असणे हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, तेच अत्यंत अगत्याचे आहे. परंतु जीवन जगण्याच्या शर्यती मध्ये आपण ते नेहमी पुढे ढकलत असतो, किंबहुना जीवनाच्या शेवटच्या पर्वासाठी आपण ते राखून ठेवलेले असते. जी गोष्ट जीवनाच्या सुरुवातीस कळली असती तर जीवन सहज झाले असते तीच गोष्ट आपण जीवनाच्या अंतिम समयी वेळ निघून गेल्या नंतर शोधण्यास सुरुवात करतो. स्वतःची खरी ओळख असणे हा आपला ...

आपण काय शोधत आहोत?

इमेज
  या अस्थिर जगात आपण काय शोधीत असतो? आपणास काय हवे असते? प्रत्येकजण सुख, शांती, आनंद यांचा आश्रय शोधत असतात. यासाठी आपण धर्म, देश बदलत राहतो, गुरु बदलत राहतो, नेता बदलित राहतो.  आपण सुख, आनंद शोधत असतो की समाधान शोधत असतो? समाधानाने जीवन जगताना सुख लाभत असतेच आणि परिपूर्णतेचा आनंद सुद्धा प्राप्त होतो.  आपणास नेमके काय हवे हे जर आपल्या लक्षात आले तर आपण त्याचा शोध घेवून त्याच्या समाधानात जीवन व्यतीत करू शकतो. ते जे काही आपणास हवे आहे ते आपले आपण शोधू शकतो की त्यासाठी एखाद्या गुरूकडे जावे लागेल किंवा एखाद्या मंदिरात जावे लागेल किंवा काही धर्मग्रंथ वाचावा लागेल?  आपल्या आयुष्यातील दुःख, कमतरता, नैराश्य याचे कारण शोधण्यासाठी आपणास बाहेरची मदत घ्यावी लागते. आणि ते आपण सर्वजण करीत राहतो. त्यासाठी भरपूर अभ्यास करतो, अनेक संप्रदाय मध्ये सेवा चाकरी करतो, अनेक गुरूंना शरण जातो. प्रत्येक वेळा आपणास असे वाटत राहते की होय, आपणास जे हवे ते मिळाले आहे. परंतु नंतर काही दिवसाने परत ती अतृप्तता सुरू होते आणि परत शोध सुरू होतो.  सततच्या बदलाने कंटाळलेले जीव मग कायम, अंतिम, वास्तवि...

आपण दुःख संपूर्ण संपवू शकतो काय?

इमेज
आपण नैराश्य आणि दुःख यांच्या सतत चालू असणाऱ्या मालिके मधून स्वतःस वाचवू शकतो काय? पूर्वी बुद्ध, ख्रिस्त आणि त्यांच्या सारखे अनेक महामानव होवून गेले होते. असे सांगितले जाते की त्यांनी त्यांचे स्वतःचे दुःख संपविले होते. परंतु त्यांनी जगातून दुःख आणि नैराश्य यांना हद्दपार केले नाही. अजूनही दुःख आणि नैराश्य यांनी मानव समाज त्रस्त आहे. आपण काही क्षणात सर्व दुःखापासून मुक्त होऊ शकतो काय? एखादा नदी प्रवाह आहे आणि त्यामध्ये दुःख आणि नैराश्य आहे. आपणा कडे त्या नदी प्रवाहातून बाहेर उडी मारण्याचे स्वातंत्र्य असते. तसेच समाजामध्ये राहून जर आपण त्या समाजाचे भाग बनण्याचे नाकारले तर आपण स्वतः आणि आपल्या सारख्या इतरांना दुःख मुक्त करू शकतो, आत्ता या क्षणी. आपणास जसे दुःख आणि नैराश्य याची जाणीव होते तशीच ती इतरांना सुद्धा होत असते. हि जाणीव नेहमी वर्तमानात होत असते त्यामुळे वर्तमानात कृती करणे अत्यावश्यक असते. आपण जर नंतर बघू म्हटले तर तोपर्यंत दुःखाचा एखादा डोंगर कोसळून सर्व काही संपून जाते. म्हणून जेव्हा दुःखाची जाणीव होते म्हणजे त्या सत्य परिस्थितीची जाणीव होते त्याच क्षणी कृती आवश्यक असते दुःख आणि ...

आपण बळीचे बकरे झालो आहोत काय?

इमेज
  जीवनाचे सत्य समजण्यासाठी जीवन हे गांभीर्याने घ्यावे लागते. केवळ बघ्याची भूमिका घेत जीवन जगणाऱ्या व्यक्तींना जीवनाचे सत्य समजेल असे नाही.  मी किंवा इतर कोणी आपणास मार्गदर्शन करू शकत नाही. प्रत्येकाचे जीवन वेगळे असते, त्याचे त्यालाच ते पार पाडायचे असते. वरवरच्या बघ्यांची भूमिका न घेता गांभीर्यपूर्वक प्रत्यक्ष जीवनाच्या खेळात भाग घेत जीवन जगता यायला हवे. काही लोक त्यांच्या वरील दुःखद प्रसंगांचे फायदा तोट्या मध्ये रूपांतरण करतात, अशांना त्याचे गांभीर्य कळणार नाही आणि सत्यही समजणार नाही. असे लोक दुःख, दारिद्र्य, अस्थिरता निवारण्यासाठी प्रयत्नशील नसतात. समाजात अस्थिरता अधिक असेल तर दुःख सुद्धा अधिक असते, त्यासाठी सुरक्षेची भावना अधिक प्रबळ होत जाते. सुरक्षेसाठी मनुष्य देवळात जाईल, प्रार्थना करेल, संपत्तीचा हव्यास धरेल, नेते मंडळींचा आधार शोधेल. यामुळे जगात सतत नवीन गुरु, त्यांचे ग्रंथ, त्यांचे पंथ, संप्रदाय, संघटना, पक्ष निर्माण होत असतात. कारण समाजातील अस्थिरता त्यांना नवनवीन बकरे सतत पुरवीत राहते. अस्थिर समाजातील व्यक्ती सुरक्षेसाठी इतरांनी त्यांच्या फायद्यासाठी बनविलेल्या श्रद्...

सुसंवाद मधून सत्य

इमेज
दोन व्यक्ती एकमेकांस जरी ओळखत असल्या तरी त्यांच्यात सुसंवाद असतोच असे नाही. एकमेकांना सांभाळून घेताना सुसंवाद आवश्यक आहे. सुसंवाद तेव्हाच शक्य होतो जेव्हा सर्वजण एकाच वेळी एकाच पातळीवर असतात, एकमेकांविषयी आपुलकी असते.  मी धार्मिक, अध्यात्मिक, मानसशास्त्र अथवा वैज्ञानिक वाचन करीत नाही त्यामुळे मी त्यातील अवघड संकल्पना मांडीत बसत नाही. साध्या सोप्या शब्दात आपण संवाद केला तर समजणे सहज होते.  परंतु जर आपण ते लक्षपूर्वक ऐकले नाही तर ते सुद्धा समजणे अवघड होवू शकते. ऐकणे ही सुद्धा एक कला आहे. ऐकताना आपण आपले सर्व पूर्वग्रह बाजूला ठेवायला हवेत. संपूर्ण लक्ष दिले तर ऐकणे सुलभ होते. परंतु ऐकताना जर आतून विरोध असेल, भीती असेल, आसक्ती असेल तर ते ऐकले जात नाही. किंवा आपणास आपल्या दैनंदिन जीवनात काही त्रास होत असेल तरी सुद्धा ऐकण्यावर लक्ष लागू शकत नाही. म्हणजे आपण जे ऐकत असतो ते आपलेच ऐकत असतो, समोरचे जे सांगणे असते ते आपल्या आतमध्ये उतरत नाही. त्यामुळे एकमेकांचे ऐकणे हे अतिशय अवघड होवून गेले आहे आणि ती आपल्या सर्वांची समस्या बनली आहे. कदाचित माझ्या सांगण्यात येणारे जे काही असेल ते आपणास र...