गुरु
स्वामी वेंकटेशानंद: कृष्णजी, मी आपल्या सारख्या गुरूकडे एक नम्र साधक म्हणून आलो आहे, अध्यात्मिक अर्थाने नव्हे तर त्याच्या शाब्दिक अर्थाने, अज्ञानाच्या अंधारा पासून दूर करणारा, अशा अर्थी गुरु शब्द आहे. 'गु' म्हणजे अज्ञानाचा अंधकार आणि 'रू' म्हणजे निराकरण करणारा. म्हणूनच गुरु हा अज्ञानाचा अंधकार दूर करणारा प्रकाश आहे आणि आपण आता माझ्यासाठी तो प्रकाश आहात. जसे गौतम बुद्ध हे भिक्षुंना संबोधित करायचे किंवा वशिष्ठ मुनी हे रामाला सूचना द्यायचे तसे मी आता या तंबूत बसून आपणास ऐकत आहे. आमच्याकडे उपनिषदांमध्ये या गुरूंची काही उदाहरणे आहेत; प्रथम वरुण देव, ते आपणा सारखेच गुरु होते. ते केवळ 'तपसा ब्रह्मा ... तपो ब्रह्मेती' अशा शब्दांनी आपल्या शिष्याला अनुग्रह देत असे. ब्रम्ह म्हणजे काय? मला विचारू नका. तपो ब्राह्मण, तप, तपस्या किंवा शिस्त किंवा आपण नेहमी म्हणता तसे, 'शोधा'. आणि त्याचे शिष्य स्वतःच टप्प्या टप्प्याने सत्य शोधत असत. यज्ञवल्क्य आणि उद्धलका यांनी अधिक थेट दृष्टीकोन स्वीकारला. यज्ञवल्क्य यांनी आपल्या पत्नी मैत्रेयीला शिकविण्यासाठी नेती-नेती पद्धत वापरली....