शिष्य

स्वामीजी: धन्यवाद सर. गुरु काय आहे याच्याशी जवळून संबंधित असा शिष्य म्हणजे काय हा एक प्रश्न आहे. शिष्य म्हणजे शिस्त म्हणजे शिकणे असे आपण परिभाषित केले आहे. वेदांत साधकांना त्यांच्या पात्रतेनुसार किंवा परिपक्वतानुसार वर्गीकृत करतो आणि त्यांच्या शिक्षणाच्या योग्य पद्धती त्यानुसार निर्धारित करतो. चांगली समज असलेल्या शिष्याला सात्विक मार्गदर्शन केले जाते किंवा तत्काळ जागृत करण्याचा मंत्र दिला जातो. त्याला उत्तम अधिकारी म्हणतात. मध्यम क्षमता असलेल्या शिष्यास अधिक विस्तृत उपासना दिल्या जातात; त्यांना मध्यमाधिकारी म्हणतात. तामसी लोकाना परिपक्व होण्याच्या दृष्टीने पौराणिक कथा, विधी इत्यादींसह मनोरंजन केले जाते; त्यांना अधमाधिकारी म्हणतात. कदाचित यावर तुम्ही भाष्य कराल का?  

कृष्णजी: ते करण्यासाठी, परिपक्वता म्हणजे काय हे समजले पाहिजे. परिपक्वता म्हणजे काय? ते वय, वेळेवर अवलंबून आहे काय?

स्वामीजी: नाही

कृष्णजी: तर आम्ही ते काढू शकतो. वेळ, वय हे परिपक्वता दर्शवत नाही. मग जो माणूस उच्च, बौद्धिक दृष्ट्या सक्षम आहे, अत्यंत विद्वान माणसाला परिपक्वता येते काय?

स्वामीजी: नाही तो शब्द फिरवून वळवू शकेल.

कृष्णजी: म्हणून आम्ही त्याला तो परिपक्व नाही असे समजू. एक परिपक्व, योग्य माणूस म्हणून आपले शास्त्र कोणाचा विचार करते?

स्वामीजी: ती व्यक्ति जो निरीक्षण करण्यास सक्षम आहे.

कृष्णजी: म्हणजे जो चर्च, मंदिरात, मशिदींमध्ये जाणारा माणूस नाही. बौद्धिक, धार्मिक आणि भावनिक नाही, जो बौद्धिकरित्या शब्दांचे खेळ खेळत नाही आणि जे बोलघेवडे नाही. आपण असे म्हणू शकतो, जर आपण या सर्वांना दूर केले तर परिपक्वता म्हणजे स्वार्थ केंद्रित नसणे होय - परिपक्वता म्हणजे 'मी' नसणे सूचित करते.

स्वामीजी: अद्वैत हा एक चांगला शब्द वापरू शकतो.

कृष्णजी: द्वैत निर्मिती करणारा सुद्धा हा मीपणाच असतो. 

आता, ज्यांचा मीपणा खूप तीव्र आहे, कोणाचा मध्यम आहे तर कोणाचा अतिशय क्षीण आहे अशा लोकांना आपण कसे सत्य सांगू शकाल? या तिघांना आपण कसे आवाहन करता?

स्वामीजी: या तिघांना एकाच साधनेने कसे जागृत करावे हे तसे त्रासदायकच आहे.

कृष्णजी: थांबा! जो माणूस पूर्णपणे 'मी' झाला आहे, त्याला यात रस नसणार. तो तुमचे ऐकणार नाही. आपण त्याला स्वर्ग, नरक, भीती किंवा अधिक नफा, अधिक पैसे असे वचन दिले तर तो तुमचे ऐकेल; परंतु तो काहीतरी मिळवण्यासाठी हे करील. म्हणून जो माणूस मिळवण्याची, साध्य करण्याची इच्छा करतो तो खूप अपरिपक्व आहे. त्याच्यात जागृती होणे नाही.

स्वामीजी: अगदी बरोबर.

कृष्णजी: निर्वाण, स्वर्ग, मोक्ष, सत्य किंवा ज्ञान असे काहीही त्याच्यासाठी गरजेचे नाही, तो पूर्ण अपरिपक्व आहे. आता, अशा माणसाबरोबर तुम्ही काय कराल?

स्वामीजी: त्याला पुराण कथा, रामायण, महाभारत सांगू शकतो 

कृष्णाजी: नाही, मी त्यांना कथा कश्या सांगायच्या? त्याला ऐकायचेच नाहीये. मी माझ्या कथांनुसार किंवा तुमच्या कथांनुसार त्याला जास्त पेच देऊ? त्याला एकटे का सोडत नाही?  

स्वामीजी: हे अयोग्य आहे.

कृष्णाजी: कसे अयोग्य? तो ऐकत नाही. त्याच्या पोटापाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे. हि त्याची वस्तुस्थिती लक्षात असू द्या. मला माझ्या समस्या वगळता कशाचीही चिंता नाही आणि तुम्ही त्याला म्हणता "पाहा, तू जगाचा विनाश करीत आहेस, जगातील माणसासाठी तू दुःख निर्माण करीत आहात", आणि तो तुमचे ऐकतच नाही. आपण आपल्याला आवडेल त्या मार्गाने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा 'मी' जी त्याची परिस्थिती आहे ती बदलणार नाही. जर तो बदलला तर तो मध्यभागी येतो. अर्धा 'मी' आणि अर्धा 'मी नसलेला. जो सर्वात तळाला असलेला माणूस मध्यभागी पोहोचतो याला उत्क्रांती म्हणतात.

स्वामीजी: आपण काय करू शकता?

कृष्णजी: मी त्यांना कथा सांगणार नाही, मी त्याचे मनोरंजन करणार नाही; कारण इतरही लोक त्याचे मनोरंजन करीत आहेत. मी त्या गटामध्ये का सामील व्हावे? मग मधला एक आहे, 'मी' आणि 'मी-नाही', जे सामाजिक सुधारण करतात, थोडेसे चांगले असतात, परंतु नेहमीच त्यांचा 'मी' कार्यरत असतो. सामाजिक, राजकीय, धार्मिक व्यक्ती मध्ये 'मी' कार्यरत आहे. पण तो थोडा अधिक पॉलिश केलेला असेल. आता त्याच्याशी आपण थोडे बोलू शकता, जसे की, " हे पहा, समाज सुधारणाही आपल्या जागी ठीक आहे परंतु ते कार्य आपल्याला कोठेही घेऊन जात नाही," इत्यादी. आपण त्याच्याशी बोलू शकता. कदाचित तो तुमचे ऐकेल. जरासे लक्ष देईल आणि म्हणेल, हे खूप गंभीर प्रकरण आहे, यासाठी बरेच काम करण्याची आवश्यकता आहे आणि तो सुद्धा परत त्याच्या कार्यात घसरला जाईल. 

मी तिन्ही व्यक्तींशी बोलतो, कोण परिपक्व आहे आणि कोण अपरिपक्व आहे असे त्यांच्यात मी फरक करीत नाही. आणि मी ते त्यांच्यावर सोडून देतो. ज्याला रुचत नाही तो निघून जातो ते त्याचे प्रकरण आहे. तो त्याच्या चर्च, फुटबॉल, करमणूक केंद्र किंवा जे काही त्याला आवडते तेथे तो जातो. 

पण 'तुम्ही परिपक्व आहात, आणि तुम्ही परिपक्व नाही' असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. एखाद्याला तो अपरिपक्व असल्याचे सांगणारा मी कोण आहे? हे त्याचे त्याला शोधणे आहे.

स्वामीजी: पण एखादा अज्ञानी आहे हे त्याला कळू शकेल काय?

कृष्णजी: अज्ञानी ऐकणार नाही. वास्तविक जगात ते चालू शकते. म्हणजे आपण आजारी असू तर डॉक्टर कडे जातो. तसे मानसिक, काल्पनिक जगात हा दृष्टिकोन वैध नाही. मनःस्थितीनुसार ऐकणे न ऐकणे अवलंबून असते. एखादा गाढ झोपला असेल तर तो काहीच ऐकू शकणार नाही, एखादा अर्धवट निद्रेत असेल तर तो काहीतरी ऐकेल, आणि एखादा पूर्ण जागृत असेल तर तो व्यवस्थित ऐकेल

स्वामीजी: धन्यवाद. हा एक मोठा गैरसमज दूर झाला आहे.


https://youtu.be/oByk2UgRkzc




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मानसिक मृत्यू हाच सत्य साक्षात्कार करण्याचा एकमेव मार्ग आहे

मी कोण आहे?

जीवनाची जटीलता