मी कोण आहे?
ध्यान करण्यापूर्वी, ध्यान करणारा कोण आहे? ते ओळखणे महत्वाचे आहे, बरोबर? ध्यान करणारा म्हणतो, 'मी ध्यान केले पाहिजे'. बरोबर? तुम्ही हे सर्व लक्षात घेत आहात का? ध्यान करणारा नेमका कोण आहे? तो फक्त एक विचार आहे, नाही का? कृपया नीट निरीक्षण करा.
मानवी मन आणि त्याच्या विचाराने बाह्य जगात आणि अंतर्मनात भ्रम निर्माण केले आहेत हे ज्याच्या लक्षात येते त्याला असे वाटते की ध्यानाद्वारे तो शांती मिळवू शकेन. म्हणून तो ध्यान करून विचारांवर नियंत्रण करण्याचे ठरवतो. विचार करणारा मी स्वतःला सांगत असतो, तो विचार करणारा मी आणि त्याचे विचार असे वेगवेगळे करतो आणि विचार करणारा मी म्हणतो, 'मी विचारांवर नियंत्रण ठेवले पाहिजे'. बरोबर?
द्वैत निर्माण झाल्याने विचार नियंत्रित करताना विचार करणारा मी आणि त्याचे विचार यांच्यात संघर्ष होत असतो, नाही का? यामध्येच जीवन उर्जेचा अधिक अपव्यय होत असतो, बरोबर?
तर विचार करणारा मी हा विचारांची कल्पना आहे, नाही का? तो आत्मा आहे असे मानू नका; ती संकल्पना विचारांची निर्मिती आहे. तुम्ही अपप्रचाराच्या सापळ्यात अडकला आहात. बरोबर? नाही? जेव्हा विचारवंत मी असे म्हणतो, 'मी विचारांवर नियंत्रण ठेवले पाहिजे' तो विचारवंत कोण आहे, तो कसा अस्तित्वात आला आहे? तो विचारांची निर्मिती नाही का? बरोबर?
म्हणून विचारवंत मी हा एक विचार आहे. बरोबर? अरे नाही, तुम्हाला ते समजत नाही, साहेब. तुम्ही फक्त सहमती दाखवित आहात. असे करू नका. कृपया त्याचा स्वतः शोध घ्या, तुम्हाला ते नक्की दिसेल. स्वतःकडे नीट पहा.
म्हणून जेव्हा तुम्ही म्हणता की ध्यान करूया, तुमचे ध्यान म्हणजे विचारांवर नियंत्रण करणे होय, विचारांची एकाग्रता होय आणि त्या सर्वांमध्ये संघर्ष निर्माण होत असतो. विचार हा सतत भरकटत असतो आणि तुम्ही त्याला परत परत मागे खेचण्याचा प्रयत्न करत असता. तुम्ही अनेक दिवस किंवा अनेक वर्षे हा खेळ चालू ठेवा, त्याने काही साध्य होत नाही, तो केवळ जीवन उर्जेचा अपव्यय आहे. जर तुम्ही सत्य पाहिले की विचारवंत ‘मी’ हा एक विचार आहे, विचाराशिवाय विचार करणारा मी अस्तित्वात असू शकत नाही.
म्हणून जेव्हा विचार करणारा मी आणि त्याचे विचार यांच्यात कोणताही फरक दिसत नसतो तेव्हा जीवनातील मानसिक संघर्ष संपतो. बरोबर? तुम्हाला हे समजले आहे काय, साहेब? कृपया हे खूप काळजीपूर्वक समजून घ्या, जर तुम्ही खरोखरच याबद्दल गंभीर असाल तर याचा जरूर विचार करा. जर तुम्हाला त्याचे आकलन झाले तर मग विचार करणारा मी आणि त्याचे विचार यांच्यात विभागणी होणार नाही. विचार हाच विचार करणारा मी असतो, विचार करणारा हा फक्त एक विचार आहे.
जेव्हा तुम्हाला ते कळते तेव्हा काय होते?
असण्यात जेव्हा विचार हा विचार करणारा असतो आणि विचारकर्ता विचार नियंत्रित करण्याचा, विचारांवर वर्चस्व गाजवण्याचा, त्याचे शेपूट फिरवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा दोघांमध्ये विभागणी होत असते - जागा तयार होत असते.
विचार करणारा मी हा विचारांची निर्मिती आहे, विचाराशिवाय तो विचार करणारा मी नसतो. जेव्हा विचार करणारा हा विचार आहे आणि विचार हाच विचार करणारा आहे याचे सत्य आकलन होते, तेव्हा काय घडते?
जे कृष्णमूर्ती
भाषण ३, राजघाट, ३० नोव्हेंबर १९६९.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा