जीवनाची जटीलता
सजगता, जागरूकता, ध्यान हे सरावाचा परिणाम नाही कारण सराव म्हणजे सवयीची पुनरावृत्ती आणि सवय म्हणजे जागरूकतेला नकार. जागरूकता ही वर्तमान क्षणाची असते ती भूतकाळाचा परिणाम नसते. किंवा आपण जागरूक होऊ असे म्हणणे म्हणजे जागरूकता नाही. आपण यापुढे लोभ करणार नाही असे म्हणणे म्हणजे तो पर्यंत लोभी राहणे असते, प्रत्यक्ष लोभाबद्दल अनभिज्ञ राहणे होय.
आपण एखादी जटिल समस्या कशी हाताळतो याचे आकलन खूप महत्वाचे आहे. आपण वर्तमानातील जटिलतेला भूतकाळातील जटिल माहितीने सामोरे जाऊ नये; आपण त्याकडे साधेपणाने पाहिले पाहिजे आणि आपला साधेपणा जितका जास्त असेल तितके त्याचे वास्तव जास्त स्पष्ट आकलन होईल. वास्तव समजून घेण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी मनाचा संपूर्ण साधेपणा आणि स्थिरता असणे आवश्यक आहे.
जेव्हा आपण अचानक एखादे भव्य दृश्य पाहतो किंवा एखादा महान विचार येतो किंवा उत्तम संगीत ऐकतो तेव्हा आपण पूर्णपणे शांत असतो. आपले मन हे कधीच स्थिर नसते परंतु जटिलता ओळखण्यासाठी शांत असणे महत्वाचे असते.
स्वतःचे सत्य स्वरूप, जीवनाची जटिलता समजून घेण्यासाठी, मनाचा मोकळेपणा हवा आणि भ्रामक जीवनाशी संबंधित नसणे आवश्यक आहे. परंतु आपल्याला खरे जीवन, त्याचे सौंदर्य माहित नसते म्हणून आपण जीवन जटिल करत असतो. आणि मग जीवनाच्या जटिलते विरुद्ध अविरतपणे तक्रार करत राहतो.
जे कृष्णमूर्ती,
ओजई, पाचवे सार्वजनिक भाषण, १९४६

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा