पोस्ट्स

ऑगस्ट, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नातेसंबंध म्हणजे काय?

इमेज
नातेसंबंध समजून घेण्याआधी आपण प्रथम आसक्ती म्हणजे नेमके काय असते हे समजून घेतले पाहिजे. मन हे नातेवाईक, जायदाद, श्रद्धा अशा वेगवेगळ्या गोष्टींशी का जोडले जात असते? आपण सर्वजण आतून मानसिकदृष्ट्या एकाकी असतो आणि एकटे पणाच्या भीतीवर मात करण्यासाठी आपण सुरक्षिततेसाठी इतर आसक्ती बरोबर संलग्न होतो. जिथे जिथे आसक्ती आहे तिथे दुःख असते. आयुष्यभर सतत आपण निरनिराळ्या आसक्ती जोडत राहतो आणि त्यातली एखादी गमावली तर आपल्याला त्याचे दुःख होते.  जीवन जसे आहे तसे स्वीकारणे म्हणजे जीवनाचे तथ्य स्वीकारणे असते परंतु आपले मन हे त्यातून पळवाट काढण्यासाठी दुसरे भ्रामक, काल्पनिक असे मानसिक विश्व निर्माण करीत असते.  आसक्ती म्हणजे 'जे जसे आहे ते' आणि मन त्याच्या विरुद्ध त्याला 'काय असावे' म्हणून आसक्तीच्या विरुद्ध अलिप्तता निर्माण करीत असते.   आसक्ती ही वस्तुस्थिती आहे आणि अलिप्तता हा एक मानसिक भ्रामक कल्पना आहे. वस्तुस्थितीच्या विरुद्ध भ्रम निर्माण केला आहे जो वस्तुस्थिती आणि भ्रम यांच्यात संघर्ष निर्माण करतो. अलिप्तता सारख्या विरोधी कल्पना निर्माण करून आसक्तीच्या भीतीपासून मुक्त होण्यात मन...