वैश्विक शक्ती, गुरु, सत्संग मदत करू शकतात काय?
Dialogue between J Krishnamurti and Jacob Needleman विचार हे नेहमी त्याने गोळा केलेल्या माहितीवर मंथन करत असतात. ज्यावेळी ते कंटाळतात त्यावेळी ते इतर नवीन गोष्टींच्या मागे लागतात. या नवीन गोष्टी परत त्याच्या माहितीचा भाग बनतात. विचारांना माहितीच्या जंजाळात भरपूर वाव असतो. परंतु जेव्हा आपण मला माहिती नाही असे म्हणतो तेव्हा विचार तिथे थांबतात. विचारविहिन अशी ती वैश्विक बुद्धिमत्तेची अवस्था असते. Dialogue no 01 : https://youtu.be/hhfdRE1wONY वैश्विक शक्ती, सद्गुरु, सत्संग मदत करतात काय? JN: आपण असे म्हणता की मनुष्याने स्वतःच स्वतःचा मार्ग शोधायला हवा. यामध्ये मग वैश्विक सत्तेचा काही भाग नसावा काय? JK: वैश्विक शक्ती, नियंता म्हटले की अवकाश आले आपण त्या विषयी बोलायचे आहे काय? JN: नाही. JK: मग आपल्या आतील अवकाश संबंधी? JN: दोन्हींचा विचार आवश्यक ठरेल. JK: बाह्य अवकाश अनंत आहे, आतील मर्यादित आहे. आपल्या आतील अवकाश आणि बाहेरील अवकाश यांचा संबंध आहे काय? आपल्या आतील अवकाश म्हणजे मिच्या सभोवतालची मोकळी जागा, दोन विचारांतील अंतर होय. ही आतील पोकळी मर्यादित आहे म्हणून आपण बाहेरी...