सत्य आणि वास्तव आणि त्यांची क्रिया
डेव्हिड बोहम: मुख्य प्रश्न हा आहे की, जे सत्य नव्हे ते सत्य आहे असा भास होत असतो ते जिज्ञासूला स्पष्ट होऊ शकते का?
कृष्णमूर्ती: अगदी बरोबर आहे आपले. म्हणूनच, सर, आपण आकलन / समज म्हणजे काय आहे याकडे आपण परत गेले पाहिजे. जर मला आपण ज्याला वास्तव समजतो ते व्यवस्थित स्पष्टपणे समजायला हवे म्हणजे सर्व भ्रम आणि वास्तविकता, व्यावहारिकता आणि अवास्तवपणा - जर मी ते स्पष्टपणे पाहिले तर जे काय सत्य आहे त्याचे आकलन होवू शकते काय? ती जी समज अथवा जाणीव आहे तीच ही अशी क्रिया आहे ज्यामध्ये विचारांचा मागमूसही नसतो.
डेव्हिड बोहम: जेव्हा आपण सत्याचे आकलन / सत्याची समज होते असे म्हणतो तेव्हा तिथे सत्य आणि दृष्टा असे विभाजन संभवते.
कृष्णमूर्ती: नाही, तेव्हा दृष्य आणि द्रष्टा असे विभाजन होत नसते तर फक्त आकलन होत असते.
डेव्हिड बोहम: भाषेमुळे गफलत झाली असावी. जेव्हा आपण आकलन करतो किंवा तथ्य पाहतो ते आकलन किंवा पाहणे हेच क्रिया असते, ती क्रिया हेच सत्य असते.
कृष्णमूर्ती: होय, सर.
जे काही (सत्य) आहे त्याची स्वतःची क्रिया असते.
डेव्हिड बोहम: होय, किंवा सत्यच त्याची क्रिया आहे?
कृष्णमूर्ती: अगदी तसेच, होय.
डेव्हिड बोहम: आपण येथे जे प्रस्तावित करीत आहोत ते म्हणजे जे जसे आहे ते सत्य होय, आणि एकूणच वास्तविकता केवळ दिखाव्या शिवाय काही नाही. वास्तविकता हा एक प्रकारचा देखावा आहे जो योग्य देखावा असू शकतो किंवा तो चुकीचा असू शकतो, किंवा एक भ्रम असू शकतो. वास्तविकता म्हणजेच सत्य हे सांगण्याची सगळ्यांना सवय असते.
कृष्णमूर्ती: आम्ही असे म्हटले आहे की वास्तविकता ही विचारांची कल्पना आहे. आणि विचारांनी निर्माण केलेली, बनविलेली कोणतीही गोष्ट विकृत रुपात वास्तविकता म्हणून दिसते.
आपण सत्य आणि वास्तविकता यांच्यातील संबंध शोधण्याचा प्रयत्न करीत होतो. तो एक मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा असा की, अशी काही क्रिया आहे का जी वास्तविकतेच्या क्रियेपेक्षा भिन्न आहे, ती सत्याची कृती आहे, सत्याची कृती नव्हे तर सत्यच कृती करत आहे? वास्तविकता ही भासमान आहे आणि तिच्यामध्ये विभाजन आहे.
डॉक्टर परचुरे: विभाजन कशाचे?
कृष्णमूर्ती: दृष्य आणि द्रष्टा यामधील
डेव्हिड बोहम: होय, द्रष्टा हे एक वास्तव, दृश्य नामक दुसऱ्या वास्तवाचे निरीक्षण करत आहे. सत्य हे द्रष्टा, साक्षी नसते, दृश्य नसते आणि ते विभाजित होत नसते.
कृष्णमूर्ति: मग एखाद्याच्या जीवनात अशी एखादी क्रिया आहे का जी अविभाज्य आहे?
ज्या मनाला ती अविभाज्य कृती सापडली नसेल ते मन हे नेहमीच काळाच्या बंधनात असते, संघर्षात असते, दु:खामध्ये असते आणि तशाच सर्व इतर गोष्टींमध्ये असणे हे स्वाभाविक आहे.
ज्यावेळी एखादा फक्त जे जसे आहे तसे जीवन जगत असेल त्यावेळी तो आपल्या पूर्व स्मृती आळवित बसत नाही, त्याच्या वैयक्तिक प्रतिक्रिया नसतात फक्त तो जे तथ्य आहे त्याला उपलब्ध होतो.
झाड हे जे जसे आहे तसे आहे म्हणून ते सत्य आहे परंतु आपण त्या झाडाचे वर्णन करताना त्याला विकृत करतो. झाड जसे आहे तसे त्याला पाहणे ही एक क्रिया आहे ती पाहणे क्रिया पूर्ण आहे म्हणून ती वैश्विक बुद्धीचा (INTELLIGENCE) भाग आहे. कोणतीही पूर्ण क्रिया ही वैश्विक बुद्धी असते. Truth acting in the field of reality is intelligence. सत्य अवस्था जेव्हा वास्तवात कृती / क्रिया करते तेव्हा ती सत्य अवस्थेची बुद्धिमत्ता असते. Truth is Intelligence, सत्य हे वैश्विक बुद्धिमत्ता आहे.
सर, ज्यावेळी एखादा सत्य जीवन जगत असेल त्यावेळी तो तशा वैश्विक बुद्धिमत्तेचा वापर करीत असतो, ती बुद्धिमत्ता ही त्याच्या द्वारे वास्तविक व्यवहारी जगात दिसून येते.
डेव्हिड बोहम: आणि त्याही पलीकडे.
कृष्णमूर्ति: ती वास्तवा बाहेरील आहे म्हणून ती पलीकडे आहे.
डेव्हिड बोहम: होय, बुद्धिमत्ता ही सत्याची क्रिया असते, प्रत्यक्षात ती वास्तवात (विचारांच्या जगात) असू शकत नाही.
कृष्णमूर्ति: होय, तेच आपणास म्हणायचे आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा