सत्याचा उलगडा
जे कृष्णमूर्ती आणि डॉ डेव्हिड बोहम या आधुनिक कृष्णार्जून यांच्या सुसंवाद मधून सत्य अलगद उघड झाले आहे, ज्याला याचे आकलन होईल त्याला जीवनाचे सत्य समजु शकेल. निसर्ग, माणूस, संपूर्ण विश्व हे जिथून उगम पावले आहे तो मूळ स्रोत, मुळ आधार काय आणि कसा असेल? त्याला काळाचे बंधन नसेल, ते स्वतःच स्वयंपूर्ण असेल, त्याच्या पलीकडे आणखी काही नसेल. त्याला मानवी विचार किंवा मानवी मन हे कधीच स्पर्श करू शकणार नाही. विश्व हे सुव्यवस्थित आहे. 'कॉसमॉस' या शब्दाचा अर्थ सुव्यवस्था असा होतो. निसर्ग सुव्यवस्थित आहे. जोपर्यंत माणूस त्यात ढवळाढवळ करत नाही तोपर्यंत निसर्गाची स्वतःची सुव्यवस्था असते. (माणूस हा सुद्धा निसर्गाचाच एक भाग आहे, निसर्गाच्या सुव्यवस्थेचा तो सुद्धा भाग आहे, पण मानवी मना ने निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टीत अव्यवस्था निर्माण झाली आहे). आपण आपल्या स्वतःमध्ये व्यवस्थित निरीक्षण करून, स्वअभ्यासाने, स्वतपासणीने, आपल्यातील अव्यवस्थेचे स्वरूप समजून घेऊ शकतो आणि अगदी त्याच्या अंतर्दृष्टीमुळे ती अव्यवस्था दूर होते. अत्यंत हुशार आणि ज्ञानी आणि निष्पक्ष, सुसंस्कृ...