कृष्णमूर्ती यांच्या शिकवणुकीचा गाभा
जीदू कृष्णमूर्ती यांनी १९२९ मध्ये जे भाषण केले होते त्यात त्यांच्या शिकवणुकीचा गाभा आहे. "सत्य ही मार्गरहित भूमि आहे. मनुष्य कोणत्याही संप्रदायद्वारे, कोणत्याही पंथातून, कोणत्याही धर्म-शास्त्राद्वारे, गुरु किंवा पुजारी यांच्याद्वारे किंवा कर्मकांडद्वारे, कोणत्याही तत्वज्ञानाच्याद्वारे किंवा मानसिक तंत्राद्वारे तिथे येऊ शकत नाही. त्याला ते नातेसंबंधाच्या आरश्यातून, स्वतःच्या मनातील माहिती समजून घेऊन, निरीक्षणाद्वारे शोधावे लागेल. बौद्धिक विश्लेषण किंवा अंतर्निहित विच्छेदनातून नव्हे. स्वसंरक्षणाचे कुंपण म्हणून मानवाने स्वत: मध्ये धार्मिक, राजकीय, वैयक्तिक प्रतिमा तयार केल्या आहेत. या प्रतिमा नंतर प्रतीक, कल्पना, श्रद्धा म्हणून प्रकट होतात. या प्रतिमांचे ओझे मनुष्याच्या विचारांवर, त्याच्या नातेसंबंधांवर आणि दैनंदिन जीवनावर अधिराज्य गाजवते. या प्रतिमा हेच आमच्या समस्याना कारणीभूत आहेत कारण त्या माणसाला माणसा पासून विभक्त करतात. जीवना बद्दलची मनुष्याची धारणा त्याच्या मनात आधीपासूनच स्थापित केलेल्या या प्रतिमांच्या संकल्पने नुसार बनते. त्याच्या चेतनेतील हि संकल्पनांची सामग्री हेच...