सत्य अवस्थेचे आकलन का होत नाही?
मानवी मनाला यांत्रिक सातत्य कशामुळे मिळते आणि मन ते सोडून देण्यास का घाबरते? मनात मानसिक काल कसा निर्माण होतो? मानसिक भूतकाळ हा वर्तमानातून भविष्य काळाची स्वप्ने कशी पाहतो? निश्चितच, जोपर्यंत मन 'अधिक प्राप्ती' शोधत असते, तोपर्यंत त्याला त्याच्या सातत्यतेची खात्री असते. ते सतत असमाधानी असल्याने, त्याच्या जवळ जे असते ते त्याला बदलण्यासाठी त्याला मानसिक भविष्यकाळ हवा असतो. मनाची चंचलता हि नेहमीच 'अधिक' च्या इच्छेत असते. त्यामुळे मनाला त्याचे सातत्य लाभत असते. 'अधिक' च्या मागणी मध्ये मत्सर हा अंगभूत असतो, आणि आपली सामाजिक रचना हि मत्सरावर आधारित आहे. केवळ आपल्या सांसारिक गरजा आणि नातेसंबंधां मध्येच नाही तर अधिक आध्यात्मिक प्रगती होण्याच्या इच्छेत देखील मत्सर असतो. जोपर्यंत मन हे 'अधिक प्राप्तीच्या’ बाबतीत विचार करत असते तोपर्यंत मनात मत्सर असतोच. आणि मत्सरापासून मुक्तता म्हणजे मत्सराची मनातील पूर्ण अनुपस्थिती होय. मत्सर न करण्याचा प्रयत्न हा सुद्धा मानसिक काळाचा व्यर्थ प्रयत्न असतो ज्यात मत्सर मध्ये 'अधिक’ भर पडत असते. आपण यात थोडेसे अधिक खोलात...