सत्य अवस्थेचे आकलन का होत नाही?
मानवी मनाला यांत्रिक सातत्य कशामुळे मिळते आणि मन ते सोडून देण्यास का घाबरते? मनात मानसिक काल कसा निर्माण होतो? मानसिक भूतकाळ हा वर्तमानातून भविष्य काळाची स्वप्ने कशी पाहतो?
निश्चितच, जोपर्यंत मन 'अधिक प्राप्ती' शोधत असते, तोपर्यंत त्याला त्याच्या सातत्यतेची खात्री असते. ते सतत असमाधानी असल्याने, त्याच्या जवळ जे असते ते त्याला बदलण्यासाठी त्याला मानसिक भविष्यकाळ हवा असतो. मनाची चंचलता हि नेहमीच 'अधिक' च्या इच्छेत असते. त्यामुळे मनाला त्याचे सातत्य लाभत असते.
'अधिक' च्या मागणी मध्ये मत्सर हा अंगभूत असतो, आणि आपली सामाजिक रचना हि मत्सरावर आधारित आहे. केवळ आपल्या सांसारिक गरजा आणि नातेसंबंधां मध्येच नाही तर अधिक आध्यात्मिक प्रगती होण्याच्या इच्छेत देखील मत्सर असतो. जोपर्यंत मन हे 'अधिक प्राप्तीच्या’ बाबतीत विचार करत असते तोपर्यंत मनात मत्सर असतोच. आणि मत्सरापासून मुक्तता म्हणजे मत्सराची मनातील पूर्ण अनुपस्थिती होय. मत्सर न करण्याचा प्रयत्न हा सुद्धा मानसिक काळाचा व्यर्थ प्रयत्न असतो ज्यात मत्सर मध्ये 'अधिक’ भर पडत असते.
आपण यात थोडेसे अधिक खोलात जाऊया. तुम्हा सर्वांना माहित आहे की मत्सर म्हणजे काय आहे ते. आपल्यापैकी बहुतेक जण या भावनेशी सुपरिचित आहेत आणि आपल्या मानव समाजाचा विकास हा त्यावर आधारित आहे. केवळ उच्च नीच अशा सामाजिक रचनेतच नव्हे तर आपल्या प्रत्येकाच्या आतमध्ये आपण काहीतरी अधिक बनण्यासाठी सतत प्रयत्न चालू असतो. सांसारिक व्यक्तीला बाजारात नवी वस्तू दिसली की ती हवी असते; तसेच अध्यात्मिक व्यक्तीला एखादा गुरू दिसतो आणि त्याला त्याच्यासारखे व्हायचे असते.
काहीतरी असण्याचा किंवा बनण्याचा हा सततचा प्रयत्न, आपण सध्या जे आहोत त्याबद्दल असाधारण असंतोष दर्शवितो.
परंतु जर आपल्याला वर्तमान (सत्य) काय आहे हे समजले तर आपण त्याची तुलना आपल्याला काल्पनिक भविष्य काळात जे काय व्हायचे आहे त्याच्याशी करू शकत नाही. जे वर्तमानात (सत्य अवस्था) आहे त्याची समज, त्याची मानसिक कल्पनेशी सतत तुलना करीत राहिल्याने होत नाही.
जे. कृष्णमूर्ती
मुंबई, तिसरी सार्वजनिक चर्चा, ११ मार्च १९५६
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा