पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सत्य कसे पाहता येईल

इमेज
  कावीळ झालेल्या व्यक्तीस सर्व जग पिवळे भासत असते असे म्हणतात. आपण ज्या रंगाचा चष्मा वापरतो त्या रंगाचे दृश्य दिसू लागते. फिल्म प्रोजेक्टर समोर जी फिल्म येते तेच दृश्य पडद्यावर दिसू लागते. या प्रमाणे आपले मन जे विचार करीत असते तेच दृश्य आपल्या मनाच्या पडद्यावर चालू राहते. आणि आपण सतत मनाच्या दृष्यात अडकलेले राहतो. आपण मनाच्या मानसिक विश्वात अधिक रममाण रहात असतो याची आपणास शुद्ध सुद्धा रहात नाही. मनोविश्वा मधून सहज नैसर्गिक अवस्थेत येण्यासाठी आपण ज्या काही साधना करीत असतो त्या सर्व मनाने बनविलेल्या असतात. या साधना करताना त्यांच्या विचारात आपण परत अडकत असतो. विचार विहीन अवस्थेत कसे राहायचे यासाठी सुद्धा विचार करीत राहावे लागते. आपण इतरांचा विचार केल्याशिवाय आपणास त्यांची जाणीव राहू शकत नाही. त्यामुळे आपले सर्व नाते संबंध असोत अथवा मित्रपरिवार असोत त्यांचे विचार असतील तरच आपण त्यांच्याशी संबंध ठेवू शकू. त्या अर्थाने आपल्या डोक्यातील विचार हेच आपले नातलग आणि मित्र परिवार असतात. एखाद्या व्यक्ती विषयी आपल्या डोक्यात द्वेष, मत्सर असला तर आपण त्या व्यक्तीशी त्या अनुषंगाने वागत असतो. आपल्या...