सत्य कसे पाहता येईल
कावीळ झालेल्या व्यक्तीस सर्व जग पिवळे भासत असते असे म्हणतात. आपण ज्या रंगाचा चष्मा वापरतो त्या रंगाचे दृश्य दिसू लागते. फिल्म प्रोजेक्टर समोर जी फिल्म येते तेच दृश्य पडद्यावर दिसू लागते. या प्रमाणे आपले मन जे विचार करीत असते तेच दृश्य आपल्या मनाच्या पडद्यावर चालू राहते. आणि आपण सतत मनाच्या दृष्यात अडकलेले राहतो. आपण मनाच्या मानसिक विश्वात अधिक रममाण रहात असतो याची आपणास शुद्ध सुद्धा रहात नाही.
मनोविश्वा मधून सहज नैसर्गिक अवस्थेत येण्यासाठी आपण ज्या काही साधना करीत असतो त्या सर्व मनाने बनविलेल्या असतात. या साधना करताना त्यांच्या विचारात आपण परत अडकत असतो. विचार विहीन अवस्थेत कसे राहायचे यासाठी सुद्धा विचार करीत राहावे लागते.
आपण इतरांचा विचार केल्याशिवाय आपणास त्यांची जाणीव राहू शकत नाही. त्यामुळे आपले सर्व नाते संबंध असोत अथवा मित्रपरिवार असोत त्यांचे विचार असतील तरच आपण त्यांच्याशी संबंध ठेवू शकू. त्या अर्थाने आपल्या डोक्यातील विचार हेच आपले नातलग आणि मित्र परिवार असतात. एखाद्या व्यक्ती विषयी आपल्या डोक्यात द्वेष, मत्सर असला तर आपण त्या व्यक्तीशी त्या अनुषंगाने वागत असतो. आपल्या डोक्यातील द्वेषमूलक विचार आपणास सहज पाहण्यास अडथळा ठरतं असतात. त्यामुळे खऱ्या अर्थाने आपण त्या व्यक्ती कडे पहातच नसतो. त्या व्यक्तीकडे सहज पाहण्यासाठी प्रथम आपणास आपल्या द्वेषमूलक विचाराकडे पहावे लागेल. आपले विचार जसे आहेत तसे त्या विचारांकडे आपणास पाहता यायला हवे. त्यासाठी आपले जे विचार आहेत त्यांच्या कडे दुर्लक्ष करता कामा नये, त्यांचा तिरस्कार करता कामा नये. आपले विचार जसे आहेत तसेच ते पाहण्यासाठी आपण निरपेक्ष असायला हवे. एखाद्या विषयी कसलेही मत न बनविता त्याच्या कडे पाहता यायला हवे.
आपण आपल्या मधील काम, क्रोध, मात्सर्य आदि विकारांकडे तटस्थपणे पाहायला शिकले पाहिजे. अशा तटस्थपणे पाहण्यासाठी आपल्या मधील मी असता कामा नये. आपला मी हाच मतमतांतरे तयार करीत असतो.
जे काही वर्तमान असते त्याच्या विरुद्ध आपले मन कल्पना लढवीत राहते. आपण रागीट असू तर शांत बनण्याची ते कल्पना करते. आपण हिंसक असू तर अहिंसक बनण्याची ते कल्पना करीत राहते. आपला राग आणि हिंसा हे वास्तविक असते तर त्या विरुद्धच्या मनाने बनविलेल्या शांती आणि अहिंसा या केवळ कल्पना असतात. मन जो पर्यंत अशा कल्पना रचत असते तो पर्यंत ते जे वास्तव आहे त्याचे निरपेक्ष निरीक्षण करीत नाही. समाजाने संस्कृती आणि संस्कार याच्या माध्यमातून आपणास आदर्श बनण्याचे वेड लावलेले असते आणि हे वेड आपणास वास्तवाकडे डोळेझाक करायला लावते.
जे मन समाजाने लादलेल्या संस्कार आणि संस्कृतीच्या मानसिक गुलामीतून मुक्त होते ते मन निरपेक्ष निरीक्षण करण्यास लायक बनते. असे मुक्त मन कोणत्याही चष्मा शिवाय पाहु शकते. ते मन जे पाहिलं ते अवर्णनीय असते.
Am I aware of you if I am prejudiced against you? My prejudice projects itself and prevents me from looking, and therefore I am not aware of you. To be aware, I must be aware of my prejudices, of my likes and dislikes, aware of my conditioning, that I am a Dutchman, a Hindu, a Buddhist, a Muslim. Whatever I am, I must be aware of it. And to be aware of it, I must not deny it. I mustn’t deny what I see in myself; I must look at it. I must be aware without choice, saying, ‘I’ll keep this, I won’t keep that.’ So awareness means to be aware without choice so that I can look. I can look into myself without any choice. I won’t say, ‘This is good, this is bad, this is beautiful, I’ll keep it, that is ugly, I won’t keep,’ but I will look. I will see but not judge. Can I see without judging? Can I see violence in me without judging it? This means without the censor, without the entity that judges, that says violence is wrong. Can I look at it? I can only look if there is no opposite. If I don’t have the ideal of non-violence, I can look at violence. I have been conditioned to accept the ideal, and I see that prevents me from looking at violence. So can I look at it without any ideal? And if I can look at it without an ideal, I have broken down the conditioning. Therefore the mind can look freely. So I have learnt something: the mind can be free and not be a slave to environment. J Krishnamurti, in Amsterdam, 6 May 1969
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा