सत्य कसे समजते
जे कृष्णमूर्ती आणि Dr David Bohm
जे कृष्णमूर्ती आणि डॉक्टर David Bohm यांच्या दरम्यान ज्या चर्चा झाल्या त्यामध्ये खालील शब्दांचा संदर्भ महत्वाचा आहे.
Reality हा शब्द ते मन आणि विचार यावर आधारित भ्रामक परिस्थिती बद्दल वापरीत असतात. जे आता जसे असेल त्याबरोबर जुळवून न घेता काय असावे किंवा काय नसावे याबद्दलच्या कल्पना म्हणजे भासमान जीवन.
Fact तथ्य म्हणजे जे वास्तविक आहे ते.
Action कृती हि तथ्याशी निगडित आहे, जे आता होत आहे किंवा अनुभव आणि आकलन या द्वारे प्रस्थापित झाले आहे. सत्य म्हणजे कृती. आकलन म्हणजे कृती आहे, तथ्य पाहणे म्हणजे कृती होय.
सत्य - आपण वर्तमानकाळ ज्या अर्थाने घेतो त्या अर्थाने जे काही आता आहे त्याबरोबर जगणे. सत्य तथ्य स्थापित करते. तथ्य म्हणजे त्या क्षणाची वास्तविकता आहे. जे जसे आहे तसे सत्य असते.
कृष्णमूर्ती : चला आपण पाहूया की मनुष्य आता या क्षणी आणि सदैव फक्त सत्य परिस्थिती मध्ये जीवन व्यतीत करू शकतो काय? आपण ज्यास वर्तमान समजतो त्या वर्तमान काळात मनुष्य राहू शकतो काय? म्हणजे जे जसे आहे तसे राहणे आणि काहीतरी त्यापेक्षा वेगळे असावे किंवा वेगळे असते तर याची अपेक्षा ना करता जगणे शक्य आहे काय? पूर्वीच्या आठवणी न आठवता, त्याबद्दल आकस न बाळगता फक्त जे सांप्रतचे तथ्य आहे त्याबरोबर जगता येईल काय? म्हणजे अशा बुद्धिमत्ता मध्ये जगणे जी बुद्धिमत्ता मनाची गुलाम नसते तर मनाला गुलाम करते.
आपणास स्वतःचे यथार्थ ज्ञान नसणे हे तथ्य आहे आणि आपण त्या अवस्थेत भ्रामक कल्पनांनी ईश्वर, ब्रम्ह, परब्रम्ह वगैरेंच्या कल्पना करणे हे भासमान जीवन आहे.
स्वतःचे यथार्थ ज्ञान करून घेणे आणि ज्याचा अनुभव शक्य नाही त्याबद्दल कल्पना करणे सोडून देणे हे सत्य आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा