सत्य आणि त्याची प्रत्यक्ष कृति
जे कृष्णमूर्तीः सत्य जर भ्रामक कल्पना (विचार आधारित जीवन) पासून पूर्णपणे वेगळे असेल तर दोघांच्या तुलनेत प्रत्यक्ष कृतीला दैनंदिन जीवनामध्ये काय स्थान असू शकते? ज्याला सत्य जीवन जगायचे आहे त्याला सत्य जीवनातील कृती कशी असेल याची उत्सुकता असणार. ती सत्य कृती हि कोणत्याही आदर्श संकल्पनेशी आणि भूतकाळाशी निगडीत नसेल आणि म्हणून ती समय बद्ध नसेल. कृती समयातीत असू शकेल काय किंवा कृती ही नेहमी समय बद्ध असते काय?
DR. AVID BOHM: आपणास असे म्हणायचे आहे काय की सत्य हे दैनिक मायावी जीवनामध्ये (Reality) कृती करू शकते. Reality चा सत्यावर कोणताही परिणाम होऊ शकत नाही परंतु सत्य Reality वर परिणाम करीत असावे काय?
जे कृष्णमूर्तीः होय. परंतु ज्याला केवळ सत्य जीवन जगायचे असेल जे Reality चे / विचारांचे सत्य नसेल, असे सत्य जे Reality शी संबंधित नसेल त्याच्या जीवनात सत्य कशी कृती करीत असेल? जी कृती रिॲलिटी शी संबंधित नसेल म्हणजे समयबद्ध नसेल अशी कृती असू शकेल? त्याचे मन त्याच्या भूतकाळाशी असलेले नाते संपवू शकेल? त्याचे मन भविष्य कालीन कल्पना करणे सोडून देईल? अशी कोणती कृती असेल जी मनाचा पसारा संपवू शकेल?
DR. AVID BOHM: सामान्यतः कृती हि तथ्यशी संबंधित असते. आता जे काही होत आहे, जे अनुभवात आले आहे, जे आकलनात आले आहे ते सर्व कृती आहे.
जे कृष्णमूर्तीः आपण ज्यास वर्तमान समजत असतो तो भूतकाळ असतो जो वर्तमानातून भविष्याकडे घेऊन जात असतो परंतु खरा वर्तमान हा संपूर्ण असतो, त्याचा भूत आणि भविष्य यांच्याशी संबंध नसतो.
DR. DAVID BOHM: सत्य आणि कृती यामध्ये फरक आहे काय? दोघांमध्ये काही संबंध आहे काय किंवा सत्य हेच कृती करत असते काय? सत्य हि समय / काल यांच्याशी संबंधित कृती असू शकणार नाही. परंतु सत्य हे कृती असतेच. सत्य हे तथ्याला प्रस्थापित करत असते. तथ्य हे त्या क्षणाचे वास्तव असते.
कृष्णमुर्ती: ते बरोबर असेल तर समज म्हणजे आकलन हि काळाची हालचाल आहे काय? भूतकाळातून वर्तमान आणि भविष्यात नेणारी एखादी गोष्ट आहे काय? किंवा समजेचा काळाशी संबंध नाही?
डेव्हिड बोहम: मी असे म्हणेन की तसा संबंध नसावा.
कृष्णमूर्ती: होय. तर मग आपण असे म्हणत आहोत की समज म्हणजे कृती, आणि कृती ही सत्य आहे आणि ते सत्य म्हणजे वास्तविकतेचे, त्या क्षणाचे आकलन होय.
डेव्हिड बोहम: होय, म्हणजे सत्य ही प्रत्यक्ष त्या क्षणाची कृती आहे.
कृष्णमूर्ती: मनुष्य अशा सत्याचे संचालन होऊ देवू शकतो?
डेव्हिड बोहम: आपण असे म्हणू शकतो का, की कृती जी दैनंदिन जीवनातील सत्याचे संचालन असते तीच वैश्विक बुद्धिमत्ता आहे?
कृष्णमूर्ती: होय. तसे नक्की असलेच पाहिजे. ती बुद्धिमत्ता तयार करता येत नाही. सत्य, प्रेम, करुणा, बुध्दिमत्ता हे जे वैश्विक आहे ते मनुष्याचे विचार तयार करू शकणार नाही.
‘सत्य’ या शब्दाचा शब्दकोशात मूळ अर्थ काय आहे?
डेव्हिड बोहम: मी काळजीपूर्वक तपासले आहे, Truth या इंग्रजी शब्दाचा मूळ अर्थ ‘प्रामाणिक’, ‘विश्वासू’ आहे. आणि लॅटिन मध्ये त्याचा अर्थ ‘व्हेरस’ म्हणजे ‘जो जसा आहे’. मला वाटते की दोन्ही अर्थ महत्त्वपूर्ण आहेत.
डेव्हिड बोहम: याचा अर्थ आपले दैनंदिन जीवन म्हणजे वास्तव हे अतिशय प्रामाणिक आणि अतिशय विश्वासू असले पाहिजे; जे त्या परम सत्याचे वाहक बनू शकेल.
कृष्णमुर्तीः मला हे समजून घ्यायचे आहे की, मनुष्य प्राणी फक्त सध्याच्या क्षणात जगू शकतो की नाही म्हणजेच, जे काही जसे आहे त्या परिस्थिती बरोबर सदैव जगणे. आणि काय असावे किंवा काय नसावे किंवा हे असे का झाले वगैरे कल्पना बरोबर जगणे सोडून देणे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा