मानवी मनामध्ये अमुलाग्र बदल कसा करायचा?
आपली बाह्य परिस्थिती ही नेहमीच आपल्या अंतरंगा मध्ये बदल होण्यास विरोध करत असते. मनुष्यप्राणी मुळातच अविवेकी आहे, याचे कारण मानवी स्मृतीमध्ये हजारो वर्षांचे जे काही अज्ञान भरले गेलेले आहे ते अज्ञान माणसाला अविवेकी बनवते. मानवी स्मृती ही भूत काळामध्ये चालणारी म्हणजेच काळानुरुप चालणारी प्रक्रिया आहे. आत्मज्ञान किंवा अंतर्ज्ञान हे स्मृती वा काल यांच्या शिवाय कार्यरत असतात. म्हणून जोपर्यंत आपण पूर्व स्मृती व काळ यांच्या आधारावर मार्गक्रमण करीत असतो तोपर्यंत आपणास अंतर्ज्ञान प्राप्त होत नाही. पूर्व स्मृती व काळाचा आधार घेणारे हजारो वर्षांपासून मानवी मनाने निर्माण केलेले श्रद्धांचे ज्ञान मानवी समस्या सोडविण्यासाठी त्यामुळे हतबल ठरले आहे. यापुढील मानवी समस्या सोडविण्यास सुद्धा ते अपयशी ठरणार आहे. आत्मज्ञानाची इच्छा असणाऱ्या साधकाच्या जीवनामध्ये तेव्हाच अमूलाग्र बदल संभवतो जेव्हा सर्व पूर्वीचे ज्ञान व साधना निरर्थक आहेत असे त्याला समजून येते.
असे सत्यशोधक साधकच सत्य काय आहे हे ऐकण्यास व समजण्यास पात्र ठरतात. असे सत्यशोधक साधकच आपल्या मध्ये अमुलाग्र बदल घडवून आणू शकतात.
आपल्यामधील अज्ञानाचा विनाश करण्यासाठी आपणास आपला अहंकार, आपले विचार, आपली स्मृती, आपला मी यांचा विनाश करणे आवश्यक आहे.
जे सत्यशोधक साधक आपला फायदा व नुकसान यांचा विचार न करता निरंतर सत्य शोधण्याचे कार्य करत राहतात त्यांच्या जीवनामध्ये परमशांत अवस्था येते ही परमशांत अवस्था प्रचंड अमर्याद ऊर्जेने भरलेली असते.
सत्य प्राप्तीसाठी आपणास आपल्या आत्मकेंद्री कर्मांचा त्याग करायला हवा. पूर्व संस्काराने ओतप्रोत भरलेले मनास जीवनाच्या अव्यवस्थेची सवय झालेली असते. जीवन सुव्यवस्थित करण्यासाठी असे अव्यवस्थित मन पूर्ण ताकदीने विरोध करते. श्रद्धाळू मन या अव्यवस्थेतून बाहेर पडण्याचा अयशस्वी प्रयत्न करते परंतु अव्यवस्थेचा शिकार झालेले मन जीवनाच्या सुरक्षित वातावरणामध्ये परत फिरते. कारण प्रत्येक जिवास व मनास सुरक्षित आणि सुखी जीवन हवे असते. म्हणून सत्यशोधक साधकास वेगळा विचार करावा लागतो, वेगळा मार्ग निवडावा लागतो जो सर्वस्वी नवीन असतो.
आपल्यामध्ये ठासून भरलेली माहिती हेच आपल्या अज्ञानाचे मूळ कारण आहे हे समजून ती माहिती व ते ज्ञान पूर्णपणे आपल्या अंतरंगात मधून भिरकावून फेकून टाकून देणे व संपूर्णतया मोकळेपणे एकटे उभे राहणे याशिवाय पर्याय नाही. हे कसे करावे व त्याबद्दल काय कृती करावी हे सगळे प्रश्न व त्याची उत्तरे हे आपणास परत मनाच्या पूर्वीच्या जाळ्यामध्ये अडकवितात. कोणतीही इच्छा मनात न बाळगता, आपला फायदा व नुकसान यांचा विचार न करता, केवळ निरिच्छ निरीक्षणाने जीवन व्यतीत करणे, होणाऱ्या प्रत्येक घटनेकडे निरिच्छ निरीक्षण मनाने बघणे हेच ध्यान आहे व हाच मार्ग आहे जो आपणास अंतर्ज्ञान प्राप्त करून देऊ शकतो.
- जे कृष्णमूर्ती यांच्या खालील प्रवचना वर आधारित.
What is the way to transform human minds?
It's the nature of outer to resist inner transformation. Man is basically irrational. That all knowledge which has occupied human memories are all ignorance. Memory is past, based on time so as long as memory is in operation insight which is not a memory and timeless cant enter. The knowledge gathered from millions of year are still not solving our problems and will not help in future. The turning point is where one understands futility of all existing knowledge and practices and stand alone, might starts his own new path for himself only.
Those Human beings who are ready to listen, inquires, searches how to transform can only transform themselves.
Steps to end ignorance is to end ego, to end Me, to end thoughts, to end Memory.
If one search without expectations of rewards and punishment can find total emptiness, total silence, nothingness which is full of unlimited energy.
To realise the Truth one has to give up all egocentric activities. Conditioned mind which is used to disorder resist with full force to bring an order. Conditioned mind tries but fall back again to safety of life, an intrinsic nature of all beings. So I have to search differently, walk on completely new path.
Discard all knowledge and stand alone, this will completely change contents of mind. How to do this will recreate all old pattern again which is the trap of mind, just keep observing without any intention.
https://youtu.be/UKzAXCKC6YA

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा