नातेसंबंध म्हणजे काय?
नातेसंबंध समजून घेण्याआधी आपण प्रथम आसक्ती म्हणजे नेमके काय असते हे समजून घेतले पाहिजे. मन हे नातेवाईक, जायदाद, श्रद्धा अशा वेगवेगळ्या गोष्टींशी का जोडले जात असते?
आपण सर्वजण आतून मानसिकदृष्ट्या एकाकी असतो आणि एकटे पणाच्या भीतीवर मात करण्यासाठी आपण सुरक्षिततेसाठी इतर आसक्ती बरोबर संलग्न होतो. जिथे जिथे आसक्ती आहे तिथे दुःख असते. आयुष्यभर सतत आपण निरनिराळ्या आसक्ती जोडत राहतो आणि त्यातली एखादी गमावली तर आपल्याला त्याचे दुःख होते.
जीवन जसे आहे तसे स्वीकारणे म्हणजे जीवनाचे तथ्य स्वीकारणे असते परंतु आपले मन हे त्यातून पळवाट काढण्यासाठी दुसरे भ्रामक, काल्पनिक असे मानसिक विश्व निर्माण करीत असते.
आसक्ती म्हणजे 'जे जसे आहे ते' आणि मन त्याच्या विरुद्ध त्याला 'काय असावे' म्हणून आसक्तीच्या विरुद्ध अलिप्तता निर्माण करीत असते.
आसक्ती ही वस्तुस्थिती आहे आणि अलिप्तता हा एक मानसिक भ्रामक कल्पना आहे. वस्तुस्थितीच्या विरुद्ध भ्रम निर्माण केला आहे जो वस्तुस्थिती आणि भ्रम यांच्यात संघर्ष निर्माण करतो. अलिप्तता सारख्या विरोधी कल्पना निर्माण करून आसक्तीच्या भीतीपासून मुक्त होण्यात मन आपली शक्ती वाया घालवत असते.
आसक्ती पासून पळून जाण्यापेक्षा आणि भ्रम निर्माण करण्याऐवजी मनाने वस्तुस्थिती स्वीकारून दु:परिस्थितीचा सामना करायला हवा. मानवी समाजाने दु:खा सारख्या अनेक भ्रामक संकल्पना निर्माण केल्या आहेत. आपले मन हे समाजाने निर्माण केलेल्या संकल्पनांचे पालन करते, परंतु ते फक्त शब्द आहेत याचे त्याला आकलन होत नाही. अन्नाचे चित्र पाहून प्रत्यक्षातील भूक भागत नाही. शब्द म्हणजे प्रत्यक्ष गोष्ट नसते, वर्णन म्हणजे प्रत्यक्ष वस्तुस्थिती नसते. दुःख ही केवळ एक मानसिक संकल्पना आहे आणि ती वास्तविकता नाही. मन हे वस्तुस्थिती पेक्षा मानसशास्त्रीय संकल्पनांशी संलग्न असते.
आसक्ती म्हणजे मनाचा एक संभ्रम आहे याचे आकलन झाले तर नातेसंबंध या शब्दाला काहीही अर्थ रहात नाही. आपण सर्व मनुष्य प्राणी आहोत हे तथ्य आहे परंतु आपण नातलग आहोत, एकाच जातीचे आहोत, एका विशिष्ट धर्माचे किंवा देशाचे नागरिक आहोत हा भ्रम आहे, ते फक्त शब्दांचे बुडबुडे आहेत.
https://youtu.be/RVh65PTsdtA?si=q5C7wH8rRXK70k_3

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा