मार्गदर्शन
स्वामी वेंकटेशानंद: सत्य शोधण्यासाठी लोक बाह्य मदत का घेतात, दुसऱ्यांच्या कुबड्या का वापरतात? लोकांना इतरांवर अवलंबून राहायचे का आवडते, मग ते येशू, बुद्ध किंवा प्राचीन संत असोत. अडलेल्याना मदत न करणे जेव्हढे अयोग्य आहे तेव्हढेच त्यांना चमच्याने भरविणे अधिक अयोग्य आहे. अशावेळी आपना सारखी व्यक्ती काय करते?
दोन प्रश्न आहेत. आम्ही का शोधत असतो? आणि, आपणास कुबड्यांची आवश्यकता का भासते?
कृष्णमूर्ति: माणसे दुःखी असतात आणि त्यांना सुख हवे असते. सुख आणि आनंद शोधण्याचा तो एक प्रकार आहे. ज्ञान म्हणजे काय हे कोणास माहिती नसते. धर्मग्रंथ वाचून ते त्याकडे आकर्षित होतात आणि जे वाचले आहे तेच ते शोधतात.
एखाद्याला मिळकत कमी आहे, त्याने अधिक मिळविण्याचा प्रयत्न करणे रास्त आहे. परंतु मानसिकदृष्ट्या, अंतर्भूतपणे, आपण काय शोधत असतो? आणि तेव्हा आपण ते शोधत असताना ते खरे आहे की नाही हे कसे कळते? आपला शोध हेच सत्य आहे हे आपणास कसे कळेल? शोधण्या पेक्षा का शोधावे हा मूलभूत प्रश्न नव्हे काय? आणि आपणास जे वाचून ऐकून माहीत आहे तेच सत्य आहे असे समजले तर ते सत्य क्वचितच नसणार. जो भूतकाळ आहे तो मृत आहे, एखादी मृत गोष्ट सत्य काय आहे ते सांगू शकत नाही.
आपल्या सत्य शोधाचे मूळ कारण म्हणजे जीवनातील वेदनातून सुटणे आणि आत्मसाक्षात्कार झाल्याने आपली दुःखातून सुटका होईल अशी समज असते.
आपण दुःखातून सुटू शकतो काय? त्यास टाळणे, त्यास प्रतिकार करणे, त्यापासून पळून जाणे अशाने दुःखमुक्ती शक्य नाही. दुःख जवळ राहते. जिथे जावू तिथे अजूनही दुःख असतेच.
आपणास समजा पोटाचा त्रास होत असेल तर त्याचे कारण आपण काही चुकीचे खाल्ले होते हे कळणे आवश्यक आहे. मग आपण चुकीचे अन्न टाळतो. दु:खाचे कारण अवतीभोवतीच्या परिस्थितीने तयार केलेले नसल्यास स्वत:ला यापासून मुक्त कसे करावे हे माझे मला शोधावे लागेल. तर मला काय करावे लागेल की स्वत: मध्ये हे जाणून घ्यावे की दु: ख का अस्तित्वात आले आहे, मी का दु: ख भोगत आहे. मग, तो शोध आहे काय? नाही.
मग मला माझे दुःख निवारण्यासाठी, दुखमुक्त जीवन जगण्यासाठी काय काय करावे लागेल, काय काम करावे लागेल, तचा विचार करावा लागेल.
स्वामीजी: समजा एखादा माणूस समोरच्या दरवाजातून जाताना मध्येच अडकला असेल, तिथे जाताना तो या टेबलाला धडकला …
कृष्णाजी: रस्त्यामध्ये टेबल आहे हे त्याने जाणलेच पाहिजे. जेव्हा आपण दाराकडे जात असतो तेव्हा वाटेत एक अडथळा असतो हे त्याने ओळखलेच पाहिजे. जर तो डोळस असेल तर त्याला तो अडथळा दिसेल. परंतु जर आपण त्याला सांगत राहिलो की, “तेथे दार आहे, तेथे टेबल आहे, टेबलावर धडकू नको”, तर त्याला लहान मुला प्रमाणे वागणूक देणे होईल. त्याला काही अर्थ नाही.
स्वामीजी: म्हणजे तशी मदत करणे, त्याच्या निदर्शनास आणणे हे योग्य आहे काय?
कृष्णाजी: आपल्या जवळपास सभ्य अंतःकरणाचा कोणताही सभ्य माणूस तेव्हढे मार्गदर्शन करीत असतो.
https://youtu.be/oByk2UgRkzc

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा