गुरु
स्वामी वेंकटेशानंद: कृष्णजी, मी आपल्या सारख्या गुरूकडे एक नम्र साधक म्हणून आलो आहे, अध्यात्मिक अर्थाने नव्हे तर त्याच्या शाब्दिक अर्थाने, अज्ञानाच्या अंधारा पासून दूर करणारा, अशा अर्थी गुरु शब्द आहे. 'गु' म्हणजे अज्ञानाचा अंधकार आणि 'रू' म्हणजे निराकरण करणारा. म्हणूनच गुरु हा अज्ञानाचा अंधकार दूर करणारा प्रकाश आहे आणि आपण आता माझ्यासाठी तो प्रकाश आहात. जसे गौतम बुद्ध हे भिक्षुंना संबोधित करायचे किंवा वशिष्ठ मुनी हे रामाला सूचना द्यायचे तसे मी आता या तंबूत बसून आपणास ऐकत आहे.
आमच्याकडे उपनिषदांमध्ये या गुरूंची काही उदाहरणे आहेत; प्रथम वरुण देव, ते आपणा सारखेच गुरु होते. ते केवळ 'तपसा ब्रह्मा ... तपो ब्रह्मेती' अशा शब्दांनी आपल्या शिष्याला अनुग्रह देत असे. ब्रम्ह म्हणजे काय? मला विचारू नका. तपो ब्राह्मण, तप, तपस्या किंवा शिस्त किंवा आपण नेहमी म्हणता तसे, 'शोधा'. आणि त्याचे शिष्य स्वतःच टप्प्या टप्प्याने सत्य शोधत असत. यज्ञवल्क्य आणि उद्धलका यांनी अधिक थेट दृष्टीकोन स्वीकारला. यज्ञवल्क्य यांनी आपल्या पत्नी मैत्रेयीला शिकविण्यासाठी नेती-नेती पद्धत वापरली. आपण ब्रह्मचे सकारात्मक वर्णन करू शकत नाही परंतु जेव्हा आपण इतर सर्व संकल्पना संपवता तेव्हा ते तेथे असते. आपण त्या दिवशी म्हटल्याप्रमाणे, वैश्विक करुणेचे - प्रेमाचे वर्णन केले जाऊ शकत नाही परंतु प्रेम नसलेल्या गोष्टी काढून टाकून त्याचा बोध होवू शकतो. उद्धलकाने आपल्या अनुयायांना सत्य पाहण्यास सक्षम करण्यासाठी अनेक उपमा वापरल्या आणि त्यानंतर तत त्वं असी या लोकप्रिय अभिव्यक्तीने ते नाहीसे केले. दक्षिणमूर्तींनी शांतपणे आणि चिन्मुद्राद्वारे आपल्या शिष्यांना सूचना दिल्या होत्या. असे म्हटले जाते की सनत्कुमार त्यांच्याकडे सुचनासाठी गेले होते. हे जुने ऋषी त्याच्याकडे गेले आणि दक्षिणमूर्तींनी शांत बसून चिन्मुद्रा दाखविली आणि शिष्यांनी त्याच्याकडे पाहिले आणि त्यांना ज्ञान प्राप्त झाले.
वरील उदाहरणावरून असा विश्वास आहे की गुरूची मदत घेतल्याशिवाय सत्याची जाणीव होऊ शकत नाही. अर्थात सानेन इथे नियमितपणे येणार्या लोकांनाही त्यांच्या शोधात आपल्या मार्गदर्शनाने खूप मदत केली जाते. आता, तुमच्या मते, गुरूची भूमिका काय आहे?
कृष्णजी: सर, जर तुम्ही शास्त्रीय अर्थाने गुरु हा शब्द वापरत असाल, जो अंधाराचा, अज्ञानाचा नाश करणारा आहे, तर तो अंधकार दूर करण्यास खरोखर दुसरा कोणीही मदत करू शकतो काय? समजा 'ए' अज्ञानी आहे आणि आपण सांगितलेल्या अर्थाने त्याचा गुरु - जो अंधाराचा निवारण करतो आणि जो दुसर्याचा भार वाहतो, जो मार्गदर्शन करतो - असे गुरू दुसर्यास मदत करू शकतात काय? गुरू दुसर्याचा अंधार दूर करू शकतो काय? - सैद्धांतिकदृष्ट्या नव्हे तर प्रत्यक्षात.
आपण जर एखाद्याचे गुरू असाल तर आपण दुसऱ्या व्यक्तीच्या अंधाराचा नाश करू शकता? तो दुःखी आहे, गोंधळलेला आहे, पुरेशी जाण नाही, पुरेसे प्रेम नाही तरीही त्याचा अंधकार आपण दूर करू शकता? किंवा त्याने स्वतःच स्वतःच्या अंधकारावर प्रचंड काम करायला हवे आहे? आपण कदाचित असे म्हणू शकता की, त्या मार्गाने जा, पण त्याला त्याचे काम सुरुवाती पासून शेवटपर्यंत स्वतः पूर्ण करावे लागेल. म्हणूनच, आपण दुसर्यास सर्वस्वी मदत करू शकत नाही असे म्हटले तर त्या गुरु शब्दाच्या स्वीकृत अर्थाने आपण गुरु नाही.
स्वामीजी: याबद्दल तो अज्ञानी आहे. हा मार्ग आहे, तूला असे असे जावे लागेल. गुरु ते निदर्शनास आणून त्याचे अज्ञान दूर करू शकतो.
कृष्णजी: तुम्ही रस्ता दाखविला की तुमचे काम तिथेच संपते. त्याला तिथे स्वतः चालत जावं लागतं, तो त्याचा अंधकार स्वतः काढतो.
स्वामीजी: म्हणजे त्याच्या अज्ञानाचा अंधकार दूर होतो.
कृष्णजी: नाही, तुम्ही मार्ग दाखविल्या नंतर त्याला उठावे लागेल, मार्गक्रमण करावे लागेल, त्यासाठी काय करावे लागेल हे त्याला पाहावे लागेल, त्याला ते सर्व करावे लागेल. त्यालाच त्याचा अंधकार काढावा लागेल.
स्वामीजी: ते बरोबर आहे.
कृष्णजी: म्हणजे गुरु शिष्यांचा अंधकार दूर करू शकत नाही. आपण आता थोडे स्पष्ट बोलू या. अज्ञान म्हणजे समजुतीचा अभाव किंवा स्वतःचे आकलन नसणे, मी ची खरी ओळख नसणे होय. मी चे अज्ञान फक्त मी यालाच समजू शकते इतर कोणास समजून चालत नाही, तिथे इतर कोणी मी शिवाय नसतेच. इतर मार्गदर्शन करू शकतील पण ते मी याला आकलन झाले तर उपयोग आहे, नाही तर सर्व डोक्या वरून गेले तर?
स्वामीजी: अगदी बरोबर आहे. परंतु कृष्णजी, आपण ते मार्गदर्शन करणे आवश्यक आहे हे मान्य कराल का?
कृष्णजी: होय, नक्कीच. आपण सर्वजण तसे करतो. मी रस्त्यावरील एका माणसाला विचारतो, "सानेनचा मार्ग कोणता आहे ते कृपया मला सांगाल का", आणि तो मला सांगतो; परंतु मी त्याची भक्ती करत बसत नाही आणि म्हणत नाही, "माझ्या देवा, तू महान मनुष्यांपैकी एक आहेस. गुरुर ब्रम्हा, गूरुर विष्णू…."
ते खूप बालिश आहे!
स्वामीजी: धन्यवाद सर.
(स्वामी वेंकटेशानंद यांच्याशी सॅनन येथे २५ जुलै १९६९ रोजी पहिला संवाद
https://youtu.be/oByk2UgRkzc )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा