चैतन्य हे विचारांचे बनलेले आहे


 चैतन्य हे फक्त विचार आहेत - कृष्णमूर्ति

पारंपरिक तत्वज्ञान हे चैतन्य आणि त्याच्या चार अवस्था यांना अतिशय महत्त्व देते. जागृती, स्वप्न, सुशुप्ती, तुरिया अशा चैतन्याच्या त्यांनी वेगवेगळ्या अवस्था सांगितल्या आहेत. जागृती मधील जाणीव आणि इतर अवस्थेतील जाणीव या वेगवेगळ्या आहेत आणि जी व्यक्ती या सर्व अवस्था आणि सर्व जाणिवांच्या अतीत जाईल त्याला सर्वज्ञ समजण्याचा पारंपरिक गैरसमज आहे.

मुळात मी म्हणजे काय याची समज नसल्याने परंपरांनी त्याला आत्मा असे संबोधले होते. प्रत्येक जीवाचा जसा आत्मा तसा त्यांनी विश्वाचा विश्वात्मा, परमात्मा आणि त्यांच्या ब्रम्ह अवस्था अशा अनेक संकल्पना तयार केल्या. या काल्पनिक संकल्पनांचा कोणालाच अनुभव येत नसतो. म्हणून मग चार अवस्थांचा निरास झाल्या नंतर त्याची अनुभूती होईल असे त्यांनी खोटे सांगितले. त्यांनी त्यांचे अज्ञान अशा प्रकारे झाकून ठेवून त्या अज्ञानाला श्रद्धा च्या आवरणामध्ये अधिक मजबूत केले. कोणत्याही साधकाने कितीही मोठी साधना केली तरी तो चार अवस्थांचा निरास करू शकणार नाही आणि त्यांचे बिग फुटणार नाही याची तजवीज या चार अवस्था निराकरण लबाडी मध्ये आहे. 

कृष्णमूर्ती यांच्या हा प्रकार लक्षात आल्या मुळे त्यांनी प्रथम प्रहार या चार अवस्थांवर केला होता. यासाठी त्यांनी चैतन्य म्हणजे केवळ विचार आहेत असे सांगितले. आपणास खुर्चीची जाणीव तेव्हाच होते जेव्हा खुर्चीचे विचार येतात. विचारां शीवाय कोणतीही जाणीव शक्य नाही. 

आणि मग विचार म्हणजे नेमके काय हे त्यांनी खालील प्रमाणे विषद केले आहे : 

  • कोणताही अनुभव आला की तो प्रथम स्मृती मध्ये साठविला जातो,
  • अनुभव काय होता हे विषद करण्यासाठी स्मृती मधून प्रतिक्रिया उमटते
  • ही प्रतिक्रिया म्हणजेच मी असतो,
  • आपले सर्व विचार ही स्मृतींची प्रतिक्रिया असते
  • विचार हे अनुभव झाल्या नंतर उमटतात,
  • अनुभवांचे आणि त्याच्या स्मृतींचे शब्दात येणे म्हणजे विचार होत
  • मी आणि विचार हे भूतकाळ असतात
  • मी आणि विचार हे वास्तविक नसून ते प्रतिक्रिया असतात म्हणून त्यांना भास समजले जाते
  • सर्व विचार हे स्मृती मधून निर्माण होतात
  • या विचारांना परंपरांनी चैतन्य म्हटले आहे
  • विचारांना चैतन्य म्हटल्या मुळे ते विचारा पासून वेगळे होत नाहीत. 
  • विचार हा काही सेकंद पूर्वीचा असो अथवा काही वर्षा पूर्वीचा असो ते सर्व स्मृतींचा भाग असतात. म्हणून त्यांच्या अनेक अवस्था करणे किंवा त्यांना वेगवेगळी नावे देणे हे चुकीचे आहे. 
  • विचार हे नेहमी भूतकाळ बाबत असतात ते कधीच वर्तमानात नसतात. ते केवळ बाह्य प्रतिक्रिया असल्याने ते त्या अलीकडील वर्तमान जानु शकत नाहीत.
  • विचार हे नेहमी प्रतिसाद रुपात येत असतात, ते कधीच प्रत्यक्ष कृतीचा भाग नसतात. 
  • विचारांना कितीही सूक्ष्म किंवा कितीही विशाल केले तरी ते विचारच असतात. 
  • विचार हे कधीच स्वयंभू नसतात. आपण जेव्हा विरोध करतो किंवा सहमत असतो, तुलना करतो, निषेध करतो त्यासाठी प्रतुत्तर म्हणून विचार वापरतो. विचार स्मृतीवर आधारित आहे आणि कोणत्याही अवस्थेचे सत्य शोधण्यासाठी ते कधीही स्वतंत्र होऊ शकत नाही

मग आपल्या जीवनात विचारांचे स्थान काय असावे?

विचार हे नेहमी प्रतिक्रिया असतात त्यामुळे विचार नव निर्मिती करू शकत नाहीत. नवनिर्मिती साठी जी कृती असते ते प्रतिक्षणी होत असते, अशी कृती ही नेहमी ताजी असते, ती परंपरा श्रद्धा यावर आधारित असू शकत नाही. विचार हे भूतकाळ असतात, स्मृती असतात. निर्मितीची मीमांसा करण्यासाठी विचार कामास येतात. विचारातून केलेली कृती ही संघर्ष आणि हिंसाचार निर्माण करीत असते. 

मन आणि विचार यांच्या पलीकडे काही (ब्रम्ह अवस्था) असावे काय?

आपणास कोणीतरी त्या बद्दल सांगितलेले असते, कोठेतरी वाचलेले असते, ऐकलेले असते. ते आपल्या श्रद्धास्थान मध्ये आलेले असते. जर एखादे तत्व हे विचारांच्या अतित असेल तर ते विचारांना समजणे कधीच शक्य होणार नाही, ती कधीच अनुभूती असणे शक्य नाही. म्हणजे जो काही त्या तत्वाचा आभास आहे तो अपप्रचार असू शकतो. आणि हा अपप्रचार हाच खरा अडथळा आहे. नावे, वर्णने, विचार, संकल्पना यामुळे त्या अवस्थेचे आकलन कठीण झाले आहे. The word is not the Thing, ते शब्दात पकडता येत नाही की त्याचे भाषांतर करता येत नाही.

शब्द आणि विचार हे थांबू शकतात काय?

शब्द आणि विचार यामुळे जर सत्य अवस्थेचे आकलन होत नसेल तर मग विचारांना थांबविणे शक्य आहे काय? 

प्रथम हे सत्य समजून घ्या की विचार हे नेहमी अगोदर माहीत असलेल्या पारंपरिक श्रद्धा आणि संकल्पना आहेत. विचार हे नेहमी जुने असतात, ते जुन्याची फक्त उजळणी असते. हे जर सत्य समजले तर हे आकलन हेच मुक्ती आहे, या आकलनात विचारांपासून मुक्ती तत्क्षणी होते.

या नंतर जे काही शिल्लक राहते ते विचार नसतात की चैतन्याच्या अवस्था नसतात, ते जागेपणाचे नसते की झोपल्या नंतरचे नसते, ते नाम विरहित असते, ते केवळ तेच असते. 

(म्हणजे तसे खरे काहीच नसते. कारण जो काही पसारा मांडला आहे तो विचारांनी मांडला आहे. विचारांचा पसारा आटोपता घेतला की जीवनातील सुव्यवस्था निर्माण होते, अशी सुव्यवस्था ज्या मध्ये अव्यवस्था नसते. आपले जिविताचे विचार असतात फक्त काल्पनिक संकल्पना आणि त्यांचे विचार नाहीसे होतात त्या मागील सत्य समजल्या मुळे).

- जिदू कृष्णमूर्ति





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मानसिक मृत्यू हाच सत्य साक्षात्कार करण्याचा एकमेव मार्ग आहे

मी कोण आहे?

जीवनाची जटीलता