कृतिशील समाज कार्य

 

आपण कृतिशील प्रयत्न करीत नाही म्हणून सामाजिक नैतिक मूल्यांचा र्हास होत आहे. समस्या अतिशय गंभीर होत चालली आहे म्हणून आपणास कृतिशील होणे आवश्यक आहे. 

कोणत्याही समस्येवर उपाययोजना करण्यापूर्वी आपणास त्या समस्येची जाणीव असणे आवश्यक असते. समस्येवरील उपाय सुद्धा तेच ते जुन्याचे केवळ नूतनीकरण नसावे. 

आपण एकमेकांचे अंधानुकरण करीत असतो, आणि ते आपल्या अंगवळणी पडले आहे. नवीन निर्माण करण्यासाठी वेळ आणि कल्पकता लागते ती आपण हरवून बसलो आहोत. कळपातील प्राण्यांप्रमाणे आपण एकमार्गी झालो आहोत. व्यक्ती ही व्यक्तिगत राहिली नसून ती समाजाचा भाग बनली आहे. समाजातील ठराविक धार्मिक किंवा सामाजिक नमुन्यांमध्ये आपण स्वतःला बसवीत असतो. अंधानुकरण मुळे व्यक्तिगत मत निर्माण होणे बंद झाले आहे. आपण प्रत्येकजण आपल्या धर्माचे, गुरूंचे, नेत्यांचे मानसिक गुलाम झालो आहोत. आपल्या प्रतिक्रिया त्यांच्या मताप्रमाणे असतात. 

मानवी समाजाच्या अवनतीचे अंधानुकरण हे एक प्रमुख कारण आहे आणि त्यामधील भयानक प्रकार हा आहे की आपण ज्यांचे अनुकरण करीत असतो ते नेते सुद्धा अंधानुकरण करत असतात आणि तेच त्यांचे चातुर्य असते. खऱ्या अर्थाने तसे आता कोणीच INDIVIDUAL राहिले नाही.

जिथे नेत्यांचे उदात्तीकरण होते तिथे त्यांच्या विचारांचे अंधानुकरण केले जाते आणि तेथील समाजाची अधोगती निश्चित आहे. याचे जर आपणास यथार्थ आकलन झाले असेल तर किमान आपण तरी कृतिशील बनायला काय हरकत असावे? आणि आपल्या लक्षात आले असेल की *समाज कृतिशील बनण्यासाठी तो अधिकार गाजविणाऱ्या नेत्यांपासून मुक्त असलाच पाहिजे. अधिकार गाजविणारा नेता असला की त्याची भक्ती सुरू केली जातेच.

नवीन उपाययोजना मूलभूत आकलना मधून आलेल्या असाव्यात, त्यासाठी नकारात्मक विचार आवश्यक असतात. जे अयोग्य आहे, चुकीचे आहे त्याचा नकार करणे, त्यांना जीवनातून हद्दपार करणे म्हणजे नकारात्मक उपाय होत. समाज कशामुळे अधोगतीस चालला आहे, ते शोधणे आणि त्याचे नकारा मध्ये रूपांतरण करणे हाच तरणोपाय असतो. नवीन काय चांगले असेल ते आकलन होई पर्यंत जे जे टाकावू असते ते टाकून जागा मोकळी केली की तिथे नवीन सहज येत राहते. 

जुन्या परंपरा, जुने विचार ज्यांनी मानव समाजाची विभागणी केली आहे त्या परंपरा, ते विचार आणि त्यांच्या श्रद्धा यांचा त्याग करायलाच हवा तरच भावी मानव समाज शांतता पूर्ण सहजीवन जगू शकतो.

 जे कृष्णमुर्ती,

Book: First and Last Freedom

Chapter: III Individual and Society




.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मानसिक मृत्यू हाच सत्य साक्षात्कार करण्याचा एकमेव मार्ग आहे

मी कोण आहे?

जीवनाची जटीलता