स्वतःची खरी ओळख


But that is the last thing we want to know about ourselves. Surely that is the only foundation on which we can build.

जी गोष्ट आपणास जीवनाच्या सुरुवातीस आकलन होणे आवश्यक असते तीच गोष्ट आपण जीवनाच्या अंतिम दिवसाकडे ढकलीत राहतो. जे ज्ञान आपल्या जीवनाचा पाया होणे गरजेचे होते ते न मिळाल्याने आपले बहुतेक जीवन अज्ञानात व्यतीत होते. परिणामी जीवन सुखद होण्या ऐवजी ते दुःख आणि नैराश्याच्या गर्तेत सापडले जाते.

जोपर्यंत आपण स्वतःस योग्य रीतीने ओळखू शकणार नाही तो पर्यंत बाहेरील गुरु, संप्रदाय, त्यांचे ग्रंथ आपणास इतर कोणीही मदत करू शकणार नाहीत. ते मदत कोणास करणार? त्यासाठी स्वताची खरी ओळख असणे म्हणजेच स्वतःचा साक्षात्कार असणे, आत्मसाक्षात्कार असणे हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, तेच अत्यंत अगत्याचे आहे.

परंतु जीवन जगण्याच्या शर्यती मध्ये आपण ते नेहमी पुढे ढकलत असतो, किंबहुना जीवनाच्या शेवटच्या पर्वासाठी आपण ते राखून ठेवलेले असते. जी गोष्ट जीवनाच्या सुरुवातीस कळली असती तर जीवन सहज झाले असते तीच गोष्ट आपण जीवनाच्या अंतिम समयी वेळ निघून गेल्या नंतर शोधण्यास सुरुवात करतो. स्वतःची खरी ओळख असणे हा आपला मूलभूत पाया असतो आणि हा मूलभूत पाया मजबूत असता तर जीवनाची इमारत किती सुंदर होईल?

जीवन घडवण्या पूर्वी, जीवनाला नावे ठेवण्या पूर्वी किंवा जीवनाचे कौतुक करण्यापूर्वी ज्याचे हे जीवन आहे त्याला ओळखायला शिकायला हवे असते. घरदार सोडून सन्यास घेण्या पूर्वी, गुरूचा शोध घेण्यापूर्वी, योग, ध्यान, उपासना करण्या पूर्वी आपल्या मी याचा शोध घेतला पाहिजे.

खरेतर प्रत्येकाने आपला जीवन प्रवास सुरू करण्यापूर्वी आपण नेमके कोण आहोत हे जाणले पाहिजे. आपण कुटुंबातील अथवा समाजातील इतरांशी संबंध जोडण्या पूर्वी स्वतःच्या अस्तित्वाशी संबंध प्रस्थापित करायला हवा. खरा जिज्ञासू व्यक्ती तीच आसेल जी जीवनातील ईतर ध्येयाचा पाठलाग करण्या पूर्वी आपल्या स्वतःचा शोध घेणे जास्त श्रेयस्कर समजेल. आपण आपल्या स्वतःला ओळखत नसतो तर आपण आपले नातेसंबंध व्यवस्थित राखू शकणार नाही, आपली समाज व्यवस्था अव्यवस्थित असेल. आणि स्वतःची ओळख असणे हे कोणत्याही नातेसंबंधात किंवा समाजव्यवस्थेत अडसर ठरणार नाही. म्हणून ज्याला समाजात किंवा कुटुंबामध्ये विशेष काही करण्याऐवजी स्वतःची ओळख करून घेणे हे प्रत्येकाचे प्राथमिक कर्तव्य आहे. जो स्वतःला यथार्थ ओळखत असेल तोच कुटुंबाचे आणि समाजाचे यथार्थ नेतृत्व सुद्धा करू शकेल. स्वतःस न ओळखणारे जेव्हा नेतृत्व करतात तेथे नेहमीच अराजक निर्माण होते.  कारण स्वतःस न ओळखता नेतृत्व करणारे लोक हे कोणत्या तरी संस्थेचे, धर्माचा, राजकीय पक्षाचा केवळ अपप्रचार करीत असतात. सत्य काय आहे हे न जाणता ते प्रत्येकजण केवळ आपला स्वार्थ सांभाळीत असतात.

स्वतःची खरी ओळख जाणणे हे दिसते तितके सोपे नसते. यासाठी अतिशय अखंड सावध असावे लागते. आपल्या विचारा बाबत, भावना बाबत आणि त्यांच्या प्रतिक्रिया बाबत अधिक सावधानता बाळगली तर आपणास सखोल जाणीव प्राप्त होवू शकते. ही सखोल जाणीव केवळ आपल्या एकट्या पुरती मर्यादित नसते तर आपल्याशी संबंधित असणाऱ्या इतर सर्वांबद्दल निर्माण होते. आपली ओळख तपासताना जी कृती होते तीच कृती इतर नातेसंबंध तपासत असते.

अधिरतेमुळे आपण सूक्ष्म निरीक्षण करत बसत नाही. ते न करता आपण इतर अनेक वरवरच्या गोष्टी मध्ये स्वतःला आकंठ बुडवीत राहतो. आपण जगभर फिरत राहाल परंतु शेवटी स्वतःच्या शोधाला परत यावेच लागते. आणि जो कोणी स्वतःचा शोध घेवू शकतो त्याच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन शक्य होते.

जे कृष्णमुर्ती,
Book : First and Last Freedom
Chapter : II - What are we seeking?









टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मानसिक मृत्यू हाच सत्य साक्षात्कार करण्याचा एकमेव मार्ग आहे

मी कोण आहे?

जीवनाची जटीलता