लबाड नेते आणि त्यांचे श्रद्धाळू भक्त यांच्यामुळे समाज निती भ्रष्ट होत आहे

आपले आणि आपल्या समाजाचे काहीतरी चांगले घडेल या आशेने आपण समाजातील विविध देव, देश, धर्म यांच्या गटांमध्ये सामील होत असतो. आणि लवकरच आपण त्यांच्या श्रद्धा - भक्ती यांच्या महत्वाकांक्षी राजकारणाच्या भयंकर मूर्खपणात हरवून जातो. नेते, राजकीय पक्ष, धार्मिक संघटनांकडे तुम्हाला बहिष्कृत करण्याची ताकद आहे; ते तुम्हाला धमकी देऊ शकतात कारण त्यांच्याकडे आर्थिक आणि मानसिक सामर्थ्य आहे आणि तुम्ही त्यांच्या उपकरावर जगत आहात. तुम्ही स्वतःला त्यांच्या साठी काम करण्यासाठी वचनबद्ध केले आहे, तुमचे मानसिक आणि आर्थिक हितसंबंध त्यांच्यासोबत आहेत. त्यांना साथ देऊन तुम्ही समाजाचे भले करण्यास निघालेले उलट तुम्ही समाजाचे नुकसान करीत आहात याचे आकलन होत नाही. 

देव, देश, धर्म यांच्या राजकारणापासून दूर जाण्यासाठी खूप मोठी समज आवश्यक आहे. कोणीही तुम्हाला मदत करणार नाही कारण प्रत्येकजण त्या सर्वांच्या श्रद्धे मध्ये अडकला गेला आहे, सर्वजण कशावर तरी श्रद्धा ठेवत आहे आणि स्वत: बरोबर इतरांना फसवित आहे. असे बिनबुडाचे जीवन जगत माणूस शेवटी थकून म्हातारा होतो; जीवनाचा शेवट निराश आणि शोकांतिका मध्ये होत असतो, तरीही असे भरकटलेले जीवन सर्वजण नाईलाज म्हणून जगत राहतात. सामान्य माणसामध्ये समाजासाठी काही चांगले कार्य करण्याची इच्छा ही एक प्रकारे फसवणूक आहे कारण लबाड नेते तेथे तुमचा चांगुलपणा, तुमची मदत करण्याची इच्छा त्यांच्या साठी वापरण्यासाठी वाट पाहत आहेत. आपण स्वतःला त्याच्या स्वाधीन करतो, आपले शोषण करण्यासाठी, आपणास वापरण्यासाठी.⁠

राजकीय पक्ष, नेते, धर्म यांच्या कडून स्वतःचे आणि इतरांचे होत असलेले शोषण पाहून, या समस्येच्या गंभिरतेची जाणीव असणे आणि सैद्धांतिकदृष्ट्या नव्हे तर प्रत्यक्षात या समस्येचा सामना करणे शक्य आहे का? खऱ्या प्रेमाच्या स्थितीत असणाऱ्या वैश्विक सत्याचा जो चांगुलपणा आहे, त्यालाच लोकांशी प्रत्यक्ष जवळीक साधण्याची संधी देणे शक्य आहे काय? सामाजिक बदल करण्याचा तोच एकमेव मार्ग आहे. जेव्हा वैश्विक सत्याचे खरे प्रेम कार्यरत असते, तेव्हा ती खूप प्रभावी स्थिती आणते, एक असाधारण परिणाम, ज्याची आपण कल्पना करू शकत नाही, विचार करू शकत नाही. सर्व लबाड नेत्यांनी लोककल्याण करण्याचा भरपूर योजना आखल्या होत्या, भरपूर विचार केला होता; त्याचे काय झाले आहे ते पहा. ते एकमेकांचे गळे कापीत आहेत, एकमेकांचा नाश करत आहेत.

ज्याला या सत्याचे आकलन होते तो समाजातील सर्व गटां पासून अलिप्त होतो आणि वैश्विक सत्य अवस्थेस तिचे काम करण्यास सहाय्यभूत होत राहतो. 


- Jiddu Krishnamurti
 Madras 11th Public Talk 9th February 1952

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मानसिक मृत्यू हाच सत्य साक्षात्कार करण्याचा एकमेव मार्ग आहे

मी कोण आहे?

जीवनाची जटीलता