Why self knowledge is so important?

आपला मेंदू हा पूर्वीच्या पिढ्यांनी आणि समाजातील प्रचलित धारणा यामुळे ठराविक विचारांनी बंदिस्त झालेला असतो यालाच conditioning of brain असे म्हटले जाते. यामुळे आपणास जीवनाची actuality म्हणजे सत्य अवस्था उमजत नाही. 

चित्रपटाच्या blank पडद्यावर जुने रेकॉर्डेड कार्यक्रम लावले जातात त्यामुळे जसा तो पडदा झाकला जातो तसे conditioned brain मुळे आपली वर्तमानातील सत्य अवस्था ज्याला आपण जीवन असे समजतो ते संपूर्णपणे झाकले जाते. या conditioned brain मध्ये आता जे काही आपण असतो त्याहून काहीतरी वेगळे बनणे तसेच सुख, दुःख, आशा- निराशा यांच्या मानसिक प्रतिमा तयार झालेल्या असतात. 

आपल्या जीवनातील हे वैचारिक दारिद्र्य संपवून जर आपणास वैश्विक विवेकाचे धनी होण्याचे असेल तर आपणास मी खरा कोण आहे हे समजले पाहिजे. स्वतःचे खरे स्वरूप समजण्यासाठी द्रष्टा आणि दृष्य हे एकच आहेत हे समजले पाहिजे आणि ते समजण्यासाठी अनुभवांचे अतिशय सूक्ष्म निरपेक्ष निरीक्षण होणे आवश्यक आहे. 

जर आपण त्यासाठी तयार असू तरच, असिमित असणारी वैश्विक विवेक बुद्धी ही आपल्या अतिशय सीमित असणाऱ्या मेंदूतील कलुषित विचारांना घालवू शकते नाहीतर आपण असेच धर्मांध राजकारणी, स्वार्थी गुरु आणि अज्ञानी सामाजिक परंपरा यांच्या हातचे बाहुले बनून आपले एकमेव जीवन व्यर्थ घालवीत राहू.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मानसिक मृत्यू हाच सत्य साक्षात्कार करण्याचा एकमेव मार्ग आहे

मी कोण आहे?

जीवनाची जटीलता