अध्यात्मिक धारणा
आपण अध्यात्मिक साधना का करत असतो याबद्दल आपली प्रत्येकाची धारणा स्पष्ट असायला हवी.
आपल्या आतील काम क्रोधादी शत्रुंमुळे आपण बाहेरील जगात शत्रुत्व निर्माण करीत असतो. म्हणजे खरी समस्या आपल्या आतमध्ये आहे आणि आपण बाहेरून ती ठीक करण्याचा प्रयत्न करीत असतो. बाहेरील राष्ट्रीयत्व, धर्म, संप्रदाय, गुरू किंवा ग्रंथ आपल्या आतील समस्या निवारण करू शकत नाहीत. समस्या बाहेर पेक्षा आतमध्ये जास्त गंभीर आहे याचे आकलन करण्यासाठी आपणास अध्यात्मिक अभ्यासाची आवश्यकता असते.
ज्ञान हे आपल्या जीवनात, आपल्या प्रत्येक कृतीत सत्याचे प्रदर्शन करीत असते, ज्याचा ख्रिश्चन धर्माशी, बौद्ध धर्माशी, हिंदू धर्माशी किंवा कोणत्याही संस्कृतीशी काहीही संबंध नाही. माणसांमधली विभागणी आणि विभाजनांमुळे मानवजातीचे ऐक्य कधीच होऊ शकत नाही.
आपण पहात आहोत की मानव किती उच्छृंखल आहे, स्वार्थी आहे आणि त्याचे प्रतिबिंब त्यांच्या श्रद्धा, कट्टरता, कर्मकांड, ईश्वर आदींच्या सर्कस मध्ये झालेले आहे. या सर्व अवांतर गोष्टींनी, मनुष्याला भीतीने जगण्याची परीस्थिती निर्माण केली आहे. अशा मानवी मनामध्ये आमूलाग्र बदल कसा होऊ शकतो?
जगात एकटे अलिप्त उभे राहणे ही सर्वात कठीण गोष्ट आहे. कोणत्याही राष्ट्राशी संबंधित नाही, कोणत्याही विचारधारेशी संबंधित नाही, कोणत्याही विशिष्ट प्रकारच्या धर्माशी संबंधित नाही, डावे किंवा उजवे, तुम्हाला स्वतःला खात्री नसलेली भ्रामक माहिती इतरांना न सांगणे. यामुळे संपूर्ण प्रामाणिकता असेल. जेव्हा तुम्ही कोणत्याही संघटनेचे, कोणत्याही गटाचे, कोणत्याही नेत्याचे, कोणाचेही अनुसरण करत असाल, तर तुम्ही प्रामाणिक नाही. याचा अर्थ असा आहे की इतक्या उच्छृंखल, विभाजित, वैमनस्य, कटुता आणि खोटेपणाने भरलेल्या जगात पूर्णपणे अलिप्त राहणे - तुम्ही हे करू शकता का?
जेव्हा सचोटी नसते, जेव्हा प्रामाणिकपणा आणि सद्गुण नसतात तेव्हा बाह्य यंत्रणा आणि संस्था आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या ठरतात. मग त्या संघटना, यंत्रणा आपल्या अज्ञानी मनावर नियंत्रण ठेवतात; पण जर मन खरोखर प्रामाणिक, सरळ, स्पष्ट असेल तर कोणत्याही प्रणालीची गरज नाही कारण ती व्यवस्था पूर्णपणे सद्वर्तनावर आधारित आहे.
अंतर्बाह्य तपासणी करण्यासाठी प्रचंड शक्ती लागते, ही शक्ती विवेकाचा वापर करते आणि जर तुम्ही दुसऱ्याची मदत घेत असाल तर तुम्ही स्वतः विवेकी असू शकत नाही.
आता सत्याचा तपास कसा करणार? आणि खरा तपासकर्ता कोण आहे?
आपली स्वतःची प्रतिमा म्हणजेच अहंकार हाच बाहेरील विश्वात विभाजन करणारा मूलभूत घटक आहे. खरा तपासकर्ता कोण आहे हे आपण आधी शोधले पाहिजे. आपला मी हा आपल्या सर्व विचारांचा प्रतिनिधी आहे आणि तोच असे म्हणतो की, मी वेगवेगळ्या विचारांमध्ये तपास करेन, परंतु सगळेच विचार हे 'मी' याचेच आहेत - बरोबर?
(आपली स्मृती हि नेहमी विचारांच्या रूपात प्रतिसाद देत असते. तिचा एक विचार स्वतःला इतर विचारांपासून वेगळे करतो आणि स्वतः मी बनतो).
जेव्हा आपला मी हा स्वतःच विभाजित झालेला आहे आणि तो जेव्हा सत्याचा तपास करतो, तेव्हा तो स्वतंत्र तपास होत नाही. म्हणून, सत्य अवस्थेचा तपास करणे, चौकशी करणे म्हणजे मीपणा पासून मुक्त होणे होय. असे निस्वार्थी मन हेच स्वच्छ आणि ताजेतवाने असते. आणि जेव्हा तुम्ही असे पुढे जाल तेव्हा तेथे कोणी निरीक्षक आहे का? तेव्हा फक्त निरीक्षण असते, तपास नसतोच. निरीक्षण करणे, म्हणजे मीपणा शिवाय अंतर्दृष्टी असणे होय. मी नसतो तेव्हा अंतर्दृष्टी असते. म्हणून जे मन अहंकारी मी पासून मुक्त आहे, ते निरीक्षण करण्यास मुक्त आहे आणि म्हणून ते निःस्वार्थपणे कार्य करू शकते.
J Krishnamurti,
SAANEN 1ST PUBLIC TALK 16TH JULY 1972.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा