मानवी मनाला जीवनाचे सत्य आकलन होऊ शकते काय?

आपण गेल्या वेळी भेटलो तेव्हा आपण अध्यात्मिक साधनेच्या प्रयत्नांच्या बद्दल बोलत होतो, अशा प्रयत्नातून आपल्यामध्ये आमूलाग्र बदल होऊ शकतो का? 

सत्य जीवन विरोधी अवस्थेत असलेल्या मनाला कोणत्याही प्रकारच्या सक्तीच्या शिस्तीने, कोणत्याही प्रकारच्या दडपशाहीद्वारे, स्वतः वर मात करण्याच्या कोणत्याही प्रयत्नाद्वारे त्या सत्य जीवन विरोधी आभासाचा अंत करणे शक्य आहे का?

आपण असे म्हटले होते की अज्ञानी मन हे ज्ञानी बनण्याच्या प्रयत्नात असायला हवे आणि आपण असाही विचार केला होता की अंतर्मनातील मतभेद, दुःख, संघर्ष असा बदल घडवून आणू शकेल का? जर आपणास शांत जीवन जगायचे असेल तर ते आपल्याला स्पष्टपणे पहावे लागेल आणि ते अत्यंत आवश्यक आहे.

मला असे वाटते की हा मुद्दा खरोखर खोलवर समजून घेणे महत्वाचे आहे की क्षुद्र मन हे त्याच्या वागण्यातून अपरिहार्यपणे स्वतःमध्ये विरोधाभास निर्माण करत असते. 

सत्य जीवन हे क्षुद्र नाही. आपण आपल्या क्षुद्र मनाच्या पातळीपर्यंत सत्य जीवनास कमी करण्याचा प्रयत्न करत असतो. पण सत्य जीवन हे खूप विशाल, खूप प्रचंड असे आहे, त्याच्या प्रमाणे सतत सावध असावे लागते.

विशाल सत्य जीवन हे आपल्या क्षुद्र मनावर प्रचंड दबाव आणते, त्याच्या आव्हानांना क्षुद्र मन सामोरे जाऊ शकत नाही आणि त्यामुळे, नकळत किंवा जाणीवपूर्वक, मन स्वत:स सत्य जीवन विरोधी आभासाची स्थिती निर्माण करत असते. 

असे आपले क्षुद्र मन हे कोणत्याही अध्यात्मिक प्रयत्ना वाचून अशी अवस्था घडवून आणू शकेल का ज्यामध्ये कोणत्याही सत्य जीवन विरोधी आभासाची स्थिती नसेल? ती आपल्या सर्वांची प्रमुख समस्या आहे.

सत्य जीवनाचे आव्हान हे खूप प्रचंड, खूप मोठे आहे, ते विलक्षण गुंतागुंतीचे आहे. हे आव्हान समग्रतेने हाताळले पाहिजे. हे केवळ वैज्ञानिक दृष्टिकोनातून किंवा रोमँटिक किंवा तथाकथित धार्मिक दृष्टिकोनातून हाताळले जाऊ शकत नाही. धर्म म्हणजे कट्टरता, श्रद्धा आणि उत्सव - सणसमारंभ यांच्या मालिकेशिवाय दुसरे काहीही नसते. आपल्या सर्वांची क्षुद्र मने या धार्मिक अवडंबर मध्ये अडकली आहेत आणि मनाने स्वतःला अनुरूप असे भ्रामक सामाजिक वातावरण निर्माण केले आहे. 

तुम्ही आणि मी हे नक्कीच बघू शकतो की जे सत्य जीवन आहे ते विलक्षण सुंदर आहे, ते खूप खोल आहे आणि खूप गहन आहे, आणि तरीही त्याला आपण आपल्या अरुंद मनाने ते पूर्ण आकलन करण्याचा प्रयत्न करत आहोत. आपल्या अरुंद लहानशा मन जे भयग्रस्त, चिंताग्रस्त, स्वार्थी, हिंसक आहे, त्याला अनेक सामाजिक आणि धार्मिक बंधने सुद्धा आहेत, त्यानुसार त्याला जगणे भाग आहे आणि त्यामुळे काय सत्य आहे आणि काय असत्य असावे यांच्या द्वंद्वात नेहमीच विरोधाभास असतो. आणि हा विरोधाभास निर्माण झाल्याने तणाव निर्माण होतो आणि त्या तणावातून अंतहीन कष्टमय कर्मे करावे लागतात. आणि आपण हा विरोधाभास निर्माण करणाऱ्या क्षुद्र मनाची अवस्था समजून घेण्याऐवजी त्याच्या परिणामी होणाऱ्या क्रियाकलापात सुधारणा करण्याचा प्रयत्न करत राहतो. आपण आपल्यात सुधारणा करण्या ऐवजी आपल्या सावली मध्ये सुधारणा करण्या सारखे ते आहे. 

स्वतःच्या मनात आमूलाग्र बदल घडवून आणणे हि खरी क्रांतिकारी गोष्ट आहे. विचारात बदल करणे शक्य होत नाही कारण विचार हे सत्य जीवन विरोधी आभासाच्या स्थितीचे केवळ प्रतिक्रिया आहे.

J KRISHNAMURTI
Pune, 3rd Public Talk,14th September 1958

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मानसिक मृत्यू हाच सत्य साक्षात्कार करण्याचा एकमेव मार्ग आहे

मी कोण आहे?

जीवनाची जटीलता