विनम्रता

 
विनम्रता हि मिळवायची किंवा जोपासायची चीज नाही. जो सद्गुण प्रयत्नपूर्वक केला जातो, जोपासला जातो, थोड्या थोड्या प्रमाणात एकत्र केला जातो, तो सद्गुण असू शकत नाही.  

नक्कीच, हा एक महत्त्वाचा मुद्दा समजून घेणे आवश्यक आहे.  

(आडात नसेल तर पोहऱ्यात कोठून येणार? पूर्वजांच्या genes मध्ये सद्गुण नसतील तर ते वारसा मध्ये येणार नाही). 

एकतर तुम्ही लोभरहित आहात, मत्सरविरहित आहात किंवा तुम्ही तसे नाही आहात. आणि जर तुम्ही लोभी असाल, मत्सरी असाल, तर तुम्ही लोभरहित, मत्सर रहित काही प्रयत्नाने किंवा काही काळा नंतर होऊ शकत नाही. आपल्यापैकी बहुतेकांना हे समजणे खूप कठीण जाते, कारण आपण काळा नुसार बदलण्याचा विचार करत असतो.  

आपण सद्गुण हळूहळू विकसित करण्याचा प्रयत्न करत असतो, आणि त्या प्रयत्नात सद्गुणांचा खरा अर्थ हरवून बसत असतो. सद्गुण आणि नम्रतेशिवाय कोणताही माणूस अध्यात्मिक प्रगती करू शकत नाही.

अध्यात्मिक चौकशी साठी नम्रता आवश्यक आहे. मी आणि अहंकार रहित अवस्थे मधील ही एक समग्रतेची भावना आहे. 

कोणत्याही समस्ये पासून मुक्त होण्यासाठी सकारात्मक किंवा नकारात्मक प्रयत्न करणारी व्यक्ती हि विनम्रतेच्या स्थितीत नसते.  

विनम्रता तेव्हाच असते जेव्हा मनाला आपल्या मधील उणीव स्पष्टपणे पाहता येत असते, जे जसे आहे ते तसे स्वीकारले पाहिजे.  

असे प्रामाणिक मन हेच सत्याची चौकशी करू शकते. असे मन जे आपल्या मधील अवगुण, त्यांच्या चांगल्या आणि वाईट दोन्ही परिणामा सह जाणून घेण्याची इच्छा धरून असते.

त्यामध्ये बदल घडवून आणण्याची, त्याला वश करण्याची किंवा जे आहे त्याचे उदात्तीकरण किंवा नावे ठेवण्याची इच्छा न ठेवता, गोष्टी जशा आहेत तशा स्वीकारण्याची त्याची तयारी असते. फक्त असे मन हेच विनम्रतेच्या स्थितीत असते.

जे कृष्णमूर्ती
मुंबई, 3री सार्वजनिक चर्चा, 30 डिसेंबर 1959

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मानसिक मृत्यू हाच सत्य साक्षात्कार करण्याचा एकमेव मार्ग आहे

मी कोण आहे?

जीवनाची जटीलता