सत्य अवस्था
सत्य अवस्था हि शून्य अवस्था आहे !!!
संपूर्ण निर्जीव ज्ञात विश्वामध्ये, जीवनाचा विकास केवळ आपल्या ग्रहावर झाला आहे. मानव हा त्या उत्क्रांतीचा एक भाग आहे, त्यात विशेष काही नाही.
या सत्याच्या अज्ञानात मानवी विचारांनी निर्माण केलेल्या सर्व मानसिक कल्पना केवळ भ्रामक आहेत, ज्यातून पुढे दुःख आणि भीती निर्माण होते. आपल्या ग्रहावरील जीवसृष्टी वगळता संपूर्ण विश्व निर्जीव आणि काल विहीन आहे.
काळ विहीन शून्य अवस्था ही विश्वाची मूलभूत अवस्था आहे.
स्वार्थी विचारांनी निर्माण केलेली माहिती गोळा करण्यास आपण ज्ञान समजण्याची चूक करीत असतो. जोपर्यंत ती माहिती गोळा करण्याची हालचाल अस्तित्त्वात आहे, तोपर्यंत शून्य होण्याची शक्यता नाही. पण जेव्हा एखादी व्यक्ती हि काहीतरी बनण्याच्या प्रयत्नाची व्यर्थता यथार्थपणे समजते तेव्हा ती समज किंवा ती अंतर्दृष्टी सतत काहीतरी बनण्याची इच्छा संपवून टाकते.
त्या भ्रामक मानसिकतेचा आणि विचारांचा अंत करणे म्हणजे शून्य अवस्था होय. शून्य अवस्थेत संपूर्ण विश्व सामावलेले आहे. मानवी विचार, कल्पना, दु:ख, चिंता, वेदना इत्यादी शून्य अवस्थेत नसतात.
शून्य अवस्थेत निस्वार्थ प्रेम, करुणा असते, तीच संपूर्ण विश्वाला चालविणारी सर्वोच्च विवेकी बुद्धी आहे.
सतत काही तरी गोळा करणाऱ्या मानवाला काहीच नसण्याचा शून्य अवस्थेची भीती वाटते.
‘मी’ हा केवळ शाब्दिक भ्रम आहे, केवळ मृत स्मृती आहे हे मला दिसत आहे. आमचा ‘मी’ हा स्मृतीचा प्रतिसाद आहे, स्मृती भूतकाळ आहे, ती मृत वस्तू आहे.
पण आपला मी म्हणजे काहीच नसून फक्त स्मृती मधील आठवणी आहे असा विचार करायला आपणास आवडत नाही ( त्यामुळे आपण स्वतःला आत्मा समजत असतो).
शून्य अवस्था हि नेहमी वर्तमानात असते, ती कालातीत, काळ विहीन अवस्था आहे. शून्य अवस्थेत काळाची छाया अजिबात नसते.
शून्य अवस्थेत सर्व विश्व असते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा