जे कृष्णमुर्ती यांच्या शिकवणीचे सार
कृष्णमूर्तींच्या शिकवणीचा गाभा 'सत्य ही एक मार्गहीन भूमी आहे' असे जे विधान त्यांनी 1929 मध्ये केले होते त्यात सामावलेले आहे.
कोणत्याही संप्रदायाच्या माध्यमातून, कोणत्याही पंथाद्वारे, कोणत्याही मतप्रणालीद्वारे, गुरूद्वारे किंवा कर्मकांडातून सत्य अवस्थे पर्यंत मनुष्य येऊ शकत नाही. तसेच कोणत्याही तत्वज्ञानाने किंवा मानसशास्त्रीय तंत्राद्वारे सुद्धा तो सत्य अवस्थे पर्यंत येऊ शकत नाही. त्याला ते त्याच्या सर्व नातेसंबंधाच्या अज्ञानातून, स्वतःच्या मनातील आशयाच्या आकलनातून, निरीक्षणातून शोधावे लागते, बौद्धिक विश्लेषणातून किंवा आत्मनिरीक्षण विच्छेदनातून ते शक्य होत नाही.
सुरक्षिततेचे कुंपण म्हणून माणसाने कुटुंब, धर्म, राजकारण यांच्या स्वतःमध्ये प्रतिमा तयार केल्या आहेत. त्यांची प्रतीके, त्यांच्या कल्पना, श्रद्धा बनून प्रकट होतात. ह्यांचे ओझे माणसाच्या विचारसरणीवर, नातेसंबंधांवर आणि दैनंदिन जीवनावर अधिराज्य गाजवते. हीच मानवी समस्यांची कारणे आहेत. सुरक्षे साठी बनविलेल्या देव, देश, धर्म, घराणी यांच्या प्रतिमा आणि प्रतीके हि माणसाला इतर माणसा पासून वेगळे करतात. जीवनाबद्दलची त्याची धारणा त्याच्या मनात आधीच प्रस्थापित झालेल्या संकल्पनांमुळे आकाराला येते. सामाजिक धारणा हीच त्याच्या वैयक्तिक धारणेची सामग्री आहे. ही सामग्री सर्व मानवतेसाठी समान आहे.
वैयक्तिक ओळख हि व्यक्तीला त्याच्या वरवरच्या नाव, गाव आणि परंपरा यांच्या माध्यमातून मिळते. व्यक्तीचे वेगळेपण हे वरवरच्या गोष्टींमध्ये नसून त्या सामुदायिक धारणेच्या सामग्रीपासून पूर्णपणे मुक्त झालेल्या स्वातंत्र्यामध्ये असते. हा मनुष्याचा भ्रम आहे की त्याला निवड करण्याची मुभा आहे म्हणून तो स्वतंत्र आहे.
स्वातंत्र्य म्हणजे लाभ आणि हानीची भीती न बाळगता, हेतूशिवाय जीवनाचे शुद्ध निरीक्षण होय. स्वातंत्र्य हे हेतूशिवाय आहे. मुक्ती हि माणसाच्या मृत्यू नंतर स्वर्गात नाही तर त्याच्या मानवी जीवनाच्या पहिल्या क्षणापासून आहे. जीवनाच्या निरपेक्ष निरीक्षणात व्यक्तीला अशा स्वातंत्र्याचा अभाव जाणवू लागतो. स्वातंत्र्य हे आपल्या दैनंदिन जीवनाच्या निरपेक्ष जाणीवेत असते.
विचार आणि मानसिक काळ हे एकच आहेत. विचार हा पूर्वअनुभवातून, पूर्व माहिती मधून जन्माला येतो, जे मानसिक काळापासून वेगळे नाही. मानसिक काळ हा माणसाचा शत्रू आहे. आपली कृती ही पूर्व माहितीवर म्हणजेच भूतकाळावर आधारित असते. त्यामुळे माणूस हा भूतकाळाचा गुलाम झालेला आहे.
जेव्हा एखाद्या मनुष्याला स्वतःच्या सामुदायिक धारणे बाबत आकलन होते, तेव्हा त्याला विचार आणि विचार करणारा मी, अनुभवकर्ता मी आणि अनुभव यांच्यातील साम्य दिसेल. त्याला कळेल की समाजाने त्यांच्यात केलेली विभागणी हा एक भ्रम आहे. हे जे निरपेक्ष निरीक्षण आहे ते भूतकाळाची छाया नसलेली अंतर्दृष्टी आहे. ही कालातीत अंतर्दृष्टी मानवी मनात खोल, आमूलाग्र बदल घडवून आणते.
( देव, देश, धर्म, घराणे या सारख्या ) सर्व भ्रामक मानसिक संकल्पनांचा संपूर्ण त्याग हे योग आणि ध्यान यांचे खरे सार आहे. (योग शास्त्रात सुद्धा सर्व संकल्प आणि विकल्प यांचा त्याग म्हणजे समाधी अवस्था होय असे सांगितले आहे.)
जेथे खरे प्रेम नसलेल्या इच्छा, वासना इत्यादि गोष्टींचा संन्यास असतो तेथे करुणेने आणि प्रेमाने ओतप्रोत असलेल्या विश्वशक्तीचे योगधाम असते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा