ज्ञान संग्रहित करणे हे यांत्रिक आहे !

 

जर तुम्ही अभियंता असाल, शास्त्रज्ञ असाल, नोकरशहा असाल किंवा कर्मचारी असाल, तुम्ही त्यामधून जे शिकलात ते तुमचे व्यावसायिक ज्ञान तुम्ही मिळवलेले असते. त्या माहितीची तुम्हाला सवय बनते. तुम्ही इतर सवयींची सुद्धा त्याला जोड देत असता आणि त्या सवयींमध्ये तुम्ही अडकले जात असतात. तुमचे मन सवयीच्या यांत्रिक अवस्थेत अडकलेले आहे - नातेसंबंधांच्या सवयीत, अभ्यास करण्याच्या सवयीत, कर्माच्या सवयीत इत्यादी.

कृपया, तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाकडे पहा. तुम्ही आता माझे ऐकताना तुम्ही स्वतःचे निरीक्षण करत आहात. आणि जर तुम्ही खरोखर स्वतःचे निरीक्षण करत असाल, तर तुम्हाला दिसेल की मन सवयीच्या यंत्रणेत कसे अडकले आहे. यात चिंता करण्यासारखे काही नाही, ते फक्त एक वास्तव आहे. खरी समस्या मनाला सवयीपासून पूर्णपणे मुक्त करणे, जेणेकरून ते जुन्या चाकोरीत चालत राहू नये किंवा जुनी सोडून देण्याच्या किंवा नष्ट करण्याच्या प्रक्रियेत सवयींची एक नवीन चाकोरी स्थापित करू नये.

सवय / नशा म्हणजे मनाची अशी अवस्था जे दुःख सोसू इच्छित नाही. जोपर्यंत मन सुखी राहू इच्छिते - ते इंजिनियरचे मन असो, वैज्ञानिकाचे मन असो, राजकारण्याचे मन असो किंवा सत्याच्या शोधात असलेल्या साधकाचे मन असो, ते कोणीही असोत - सर्वजण अपरिहार्यपणे सुखी जीवनाच्या सवयीच्या चाकोरीत अडकले जातात आणि सुखाच्या अपेक्षेने ते एका भ्रामक चाकोरीत धावत आहे याची त्यांना जाणीव होत नसते.

म्हणून आपल्या हे लक्षात आले पाहिजे की आपले मन हे सुख, सुरक्षितता, दुःखमुक्त जीवन उपभोगण्यासाठी एका ठराविक चाकोरीत धावत आहे. फक्त या सत्याची जाणीव होणे महत्त्वाचे आहे - सवय कशी मोडायची हे महत्त्वाचे नाही. एक सवय मोडण्याची इच्छाच दुसरी सवय निर्माण करत असते.

जे. कृष्णमूर्ती,

मुंबई, ८वी सार्वजनिक चर्चा, १७ जानेवारी १९६०

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मानसिक मृत्यू हाच सत्य साक्षात्कार करण्याचा एकमेव मार्ग आहे

मी कोण आहे?

जीवनाची जटीलता