दुय्यम भक्त
आपले मन हे वर्तमानपत्रे, ग्रंथ, प्रवचने यांच्या अपप्रचारामुळे प्रदूषित होत असते. अपप्रचार तंत्र हे मानव समाजाला बौद्धिक दृष्ट्या प्रदूषित करण्याचे एक फार मोठे षडयंत्र आहे. बाहेरून सतत होणाऱ्या अपप्रचार माहितीच्या भडिमारा पासून दूर रहाणे हे अतिशय अवघड झाले आहे. सत्य परिस्थिती समजण्यासाठी अपप्रचारासून प्रभावित न होणे हे अत्यंत आवश्यक असते.
जेव्हा तुम्ही वर्तमानपत्र वाचता तेव्हा तुम्ही जाणता अजाणतेपणे प्रभावित होत असता. जेव्हा तुम्ही कादंबरी किंवा पुस्तक वाचता तेव्हा तुम्ही प्रभावित होत असता; तुम्ही जे वाचता त्याचे पालन करण्यासाठी मानसिक दबाव, ताण येत असतो. अपप्रचाराचा हाच प्रमुख उद्देश असतो.
अपप्रचार हा शालेय पुस्तकांपासून, गुरुजी मार्फत शाळेत सुरू होत असतो आणि तुम्ही इतरांनी जे सांगितले आहे त्याचे पालन करत त्याप्रमाणे आयुष्य जगत असता. म्हणून तुम्ही दुय्यम मानव प्राणी झाले आहात. असा दुय्यम भक्त मानव जीवनाचे मूळ, सत्य कसे शोधू शकतो?
मन प्रदूषित होणे म्हणजे काय हे समजून घेणे आणि सखोल अभ्यास करणे हे खूप महत्वाचे आहे; जेव्हा तुम्ही ते करू लागता तेव्हा तुमच्या मनाला प्रदूषित करणाऱ्या अज्ञानाचे खंडन करण्यासाठी जीवन ऊर्जा मदत करत असते.
जिद्दू कृष्णमूर्ती
‘Flight of the Eagle‘

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा